JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

पाकिस्तान क्रिकेटचा (Pakistan Cricket) दर्जा गेल्या काही वर्षांपासून खालावला आहे. ही अवस्था का झाली? याचे कारण सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट : पाकिस्तान क्रिकेटचा  (Pakistan Cricket) दर्जा गेल्या काही वर्षांपासून खालावला आहे.  पाकिस्तान क्रिकेटचा  पाया कमकुवत झाल्यानं टीमची ही अवस्था झाली आहे. ही अवस्था का झाली? याचे कारण सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. पाकिस्तानच्या ‘एआरवाय न्यूज’नं त्यांच्या रिपोर्टमध्ये हा धक्कादायक खुलासा केलाय. पंजाब प्रांतामधील खानेवाल स्टेडियमबाबत  (Khanewal Cricket Stadium) त्यांनी खुलासा केलाय. या स्टेडियममध्ये चक्क भोपळा आणि मिर्ची यांची शेती सुरू आहे. या स्टेडियममध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सामने होणार होते. त्याचवेळी या स्टेडियममधील वास्तव उघड झालं आहे. हे स्टेडियम बांधण्याठी कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्याच स्टेडियममध्ये शेतकऱ्यांनी चक्क शेती सुरू केली आहे. त्यांनी या स्टेडियमचा ताबा घेतला. जिथं खेळाडू तयार व्हायला पाहिजे आहेत त्या ठिकाणी सध्या भोपळा, मिर्ची आणि भाज्या तयार होत आहेत.

संबंधित बातम्या

शोएब अख्तर निराश या रिपोर्टनुसार खानेवाल स्टेडियम जिल्हा प्रशासनाच्या अधिकारात येते. त्यांनी या स्टेडियमसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलाय. पण आता त्याचा भलत्याच कामासाठी वापर होत आहे. स्टेडियमची ही अवस्था पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) निराश झाला आहे. T20 World Cup : वेळापत्रक जाहीर होताच बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं! न्यूझीलंड टीम करणार दौरा पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट टीमवर 2009 साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ण बंद झाले. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी झिम्बाब्वेची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली होती. आता सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्या दौऱ्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेटची जगात पोलखोल झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या