मुंबई, 6 डिसेंबर : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याच्यासाठी हे वर्ष चांगलं ठरलं आहे. तो आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 बॅटर बनला. त्याच्या कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानने पहिल्यांच वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला पराभूत केले. तब्बल 9 वर्षांनी एखाद्या आयसीसी स्पर्धेची सेमी फायनल गाठली. या सर्व यशानंतर नंतर बाबरने आता न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलच्या (Ajaz Patel) विक्रमाची बरोबरी केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टमध्ये एजाझनं एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट विश्वातील प्रत्येक बॉलरचं ही कामगिरी करण्याचं स्वप्न असतं. एजाझनं हा विक्रम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबरने त्याची बरोबरी केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानची टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये (Pakistan vs Bangladesh) सध्या दुसरी टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी त्यानं ही कामगिरी केली आहे. पण, बाबरनं ही कमाल टेस्ट मॅचमध्ये केली नाही. कारण पावसाचा अडथळा आलेल्या या टेस्टमध्ये बाबर तर सध्या बॅटींग करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत हा दावा करण्यात आलाय. टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. त्यावेळी पाकिस्तान टीममधील खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये परस्परांमध्ये मॅच खेळली. या मॅचमध्ये बाबरनं बॉलिंगमधील स्कील दाखवत ही कमगिरी केली असा दावा करण्यात आला आहे.
बाबर आझमने हा विक्रम खरंच केला का? याचे सत्य, या मॅचमधील पाकिस्तानचे खेळाडू आणि हा व्हिडीओ तयार करणारी पीसीबीचे कर्मचारी यांनाच माहिती आहे. राहुल द्रविडला हेड कोच होण्यासाठी कसे तयार केले? दादाने सांगितली Inside Story