मुंबई, 28 जून : पाकिस्तान टीमचे बॅटींग कोच युनूस खाननं काही दिवसांपूर्वी राजीनामा (Younis Khan Resignation) दिला आहे. टीम इंग्लंड दौऱ्यावर जाण्याच्या दोन दिवस आधीच युनूसनं राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली होती. युनूस यांचा करार 2022 पर्यंत होता. तरीही त्यांनं राजीनामा का दिला? याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु होती. युनूसनं राजीनाम्याचं नेमकं कारण सांगितलं नसलं तरी पाकिस्तामनच्या मीडियानं त्याचा खुलासा केला आहे. युनूसनं केली शिवीगाळ पाकिस्तान टीम काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यात घडलेल्या प्रसंगामुळे युनूस खान यांनी राजीनामा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पत्रकार साज सादीक यांनी केला आहे. सेंच्युरीयनमध्ये झालेल्या टी20 दरम्यान युनूस खानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) सोबत वाद झाला. साज सादीक यांच्या दाव्यानुसार, “सेंच्युरीनमधील मॅचच्या दरम्यान युनूस खान टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. त्याने हसन अलीला आईस बाथ (Ice Bath) घेण्यास सांगितले. युनूसचा हा सल्ला हसन अलीने फेटाळला. त्यावेळी त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. संतापलेल्या युनूसनं यावेळी हसन अलीला, ‘तुझा बाप देखील आईस बाथ घेईल’ या शब्दात शिवीगाळ केली. दोघांचे हे भांडण चांगलेच वाढले. त्यावेळी अन्य सदस्यांना मध्यस्थी करुन हे भांडण सोडवावे लागले होते.
‘या’ 2 अटी पूर्ण करणाऱ्या मुलाशी लग्न करेल’, स्मृती मंधानानं केलं जाहीर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात घडलेल्या या प्रसंगानंतर युनूस खान नाराज झाला. तो त्यानंतर अन्य खेळाडूंमध्ये मिसळत नव्हता, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी टीम बॅटिंग प्रशिक्षकाशिवाय जाणार आहे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकाची निवड योग्य वेळी केली जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं आहे. युनूस खानला मागच्या वर्षी नोव्हेंबर 2022 आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं.