JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी : विराटच्या कॅप्टनसीवर मोहम्मद कैफचा आरोप, टीम निवडीवर म्हणाला...

मोठी बातमी : विराटच्या कॅप्टनसीवर मोहम्मद कैफचा आरोप, टीम निवडीवर म्हणाला...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील (WTC Final) पराभवानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर प्रश्न विचारले जात आहेत. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने देखील विराटच्या कॅप्टनसीवर मोठा आरोप केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील (WTC Final) पराभवानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli)  कॅप्टनसीवर प्रश्न विचारले जात आहेत. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने देखील विराटच्या कॅप्टनसीवर मोठा आरोप केला आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीममध्ये निवड कशी होते हे साफ नाही. तसेच खेळाडूंच्या मागील कामगिरीला प्राधान्य दिले जात नाही, असा दावा कैफनं केला आहे. मोहम्मद कैफनं ‘स्पोर्ट्स तक’ ला बोलताना सांगितले की, ‘टीम इंडियामध्ये सर्व काही स्पष्ट नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. विराट कोहली त्या प्रकारे खेळत नाही. तो सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना टीम निवडीमध्ये प्राधान्य देतो. त्यामुळेच सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी मिळाली. शिखर धवनला काही सामने बाहेर बसावं लागलं आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये कोणत्याही खेळाडूची टीममधील जागा सुरक्षित नाही. ही विराट कोहलीची पद्धत आहे.  अखेर एक कॅप्टन म्हणून त्यानं किती ट्रॉफी जिंकल्या हे पाहिलं जाईल. तो कॅप्टन म्हणून आजवर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.’ याकडे कैफनं लक्ष वेधले. ENG vs PAK : भर मैदानात भिडले पाकिस्तानी खेळाडू, वादाचा Video Viral कुलदीपवरही केलं होतं वक्तव्य मोहम्मद कैफनं यापूर्वी कुलदीप यादवबद्दलही वक्तव्य केले होते. कुलदीपचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही, असा दावा कैफनं केला होता. ‘माझ्या मते कुलदीप हा चांगला बॉलर आहे. तो चायनामन आहे. हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. मला खात्री आहे की, श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड त्याच्यावर विशेष लक्ष देईल.’ त्याच्या करियरचा ग्राफ ज्या पद्धतीनं खाली आला आहे ते पाहून निराश असल्याचं कैफनं सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या