JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Cricketers love to anchor: तुम्हाला कदाचित माहीत नसेल, या 5 क्रिकेटरांच्या बायका आहेत स्टार अँकर

Cricketers love to anchor: तुम्हाला कदाचित माहीत नसेल, या 5 क्रिकेटरांच्या बायका आहेत स्टार अँकर

Cricketers Married Sports Anchors : काही महिला स्पोर्ट्स अँकरनी जगभरात आपलं नाव कमावलं आहे. यातील काही स्पोर्ट्स अँकर या क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत. आज आपण अशा स्पोर्ट्स अँकरविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे पती क्रिकेटर आहेत..

0106

क्रिकेटर्सच्या बायका सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्याचे फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. त्याच्या एका झलकसाठी चाहते आतुर झालेले असतात. आज आपण अशा 5 क्रिकेटर्स बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी स्पोर्ट्स अँकर (Cricketers Married Anchors) सोबत लग्न केलं आहे. या स्पोर्ट्स अँकरनी जगभरात आपलं नाव कमावलं आहे. या क्रिकेटपटूंच्या बायका स्पोर्ट्स अँकरिंगच्या जगतात प्रसिद्ध आहेत.

जाहिरात
0206

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने 2010 मध्ये ली फर्लाँगशी लग्न केले. ली फर्लाँग एक क्रीडा प्रस्तुतकर्ता, लेखक, मॉडेल आणि व्यावसायिक महिला आहे. ली फर्लाँग हिने जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात पदवी प्राप्त केली. 2018 मध्ये, ती लेखिका बनली आणि तिने मुलांची पुस्तके लिहिली.

जाहिरात
0306

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलने डिसेंबर 2014 मध्ये त्याची गर्लफ्रेंड रोझ केलीशी लग्न केले. रोझ केली ही प्रसिद्ध अँकर असून ती चॅनल 9 शी संबंधित आहे.

जाहिरात
0406

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने 2012 मध्ये लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरशी लग्न केले. मयंती लँगर ही भारतातील सर्वात आवडत्या महिला अँकरपैकी एक आहे. तिच्याविषयी सातत्याने चर्चा होत असते. मयंतीने 2020 मध्ये मुलाला जन्म दिला.

जाहिरात
0506

न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्टिलने सप्टेंबर 2014 मध्ये गर्लफ्रेंड लॉरा मॅकगोल्डरिकसोबत लग्न केले. स्काय स्पोर्ट्स चॅनलसाठी मॅकगोल्डरिक अँकर आहे. स्पोर्ट्स अँकर असण्यासोबतच लॉरा रेडिओ होस्ट, स्पोर्ट्स रिपोर्टर आणि अभिनेत्री देखील आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

जाहिरात
0606

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्च 2021 मध्ये संजना गणेशनशी लग्न केले. संजना गणेशन एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. संजनाने वर्ल्ड कप 2019 दरम्यान अनेक प्रसिद्ध स्टार स्पोर्ट्स शो 'मॅच पॉइंट' आणि 'चीकी सिंगल्स' होस्ट केले आहेत. ती सध्या इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेचे अँकरिंग करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या