मुंबई, 18 सप्टेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) याचे भारतीय क्रिकेट वर्तुळात आदराचे स्थान आहे. द्रविड सध्या भारतीय क्रिकेटपटूंची नवी पिढी घडवण्याचं काम करत आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा देखील तो कोच होता. द्रविडच्या या अनुभवाचा फायदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यासाठी करण्याचा निर्णय बीसीसीआयनं (BCCI) घेतला आहे. तामिळनाडूचा माजी बॅट्समन श्रीधरन शरथ (S. Sharath) यांची राष्ट्रीय ज्युनिअर टीमच्या निवड समितीचे प्रमुख (Junior National Selection Committee) म्हणून शुक्रवारी निवड झाली आहे. ही निवड होताच श्रीधरन कामाला लागले असून आगामी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी योग्य टीम निवडणे हे त्यांचे मुख्य काम आहे. याच कामासाठी राहुल द्रविडची मदत घेतली जाणार आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय क्रिकेट टीमनं (Indian Cricket Team) यापूर्वी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. श्रीधरन यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बातचित करताना द्रविडला भेटण्यासाठी लवकरच बंगळुरुला जाणार असल्याचं सांगितलं. ‘तो गेल्या काही वर्षांपासून अंडर 19 टीमसोबत काम करत आहे. त्याला खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत चांगली माहिती आहे. तो आमचा मार्गदर्शक असेल. त्याच्याशी चर्चा करुन आम्ही भविष्यातील योजनांचा रोडमॅप तयार करणार आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. धक्कादायक! BCCI च्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय कोचचा मृत्यू टीम निवडीचं आव्हान कोरोना महामारीमुळे गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये कोणतेही एज ग्रुप क्रिकेट झालेलं नाही. काही महिन्यांपूर्वीच या खेळाडूंना क्रिकेटचा सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम निवडणे हे निवड समितीच्यासमोर मोठं आव्हान असेल. शरथ यांनी देखील निवड समितीकडं पुरेसा वेळ नसल्याचं मान्य केलं. पण तरीही वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम टीम निवडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं ते यावेळी म्हणाले.