मुंबई, 26 फेब्रुवारी : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. कोणत्या क्षणी सामन्याला कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्या जगाने हे पाहिलं आहे. न्यूझीलंडच्या हातात असलेला सामना एका ओव्हर थ्रोमुळे निसटला. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली आणि अखेर चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडने बाजी मारली. फक्त वर्ल्ड कप नाही तर दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सामन्यातही अनेकदा असे क्षण आले आहेत. अखेरच्या चेंडूवर अविश्वसनीय असा विजय संघांनी मिळवला आहे. जिंकलेला सामना गमावण्याची वेळ एका चुकीमुळे ओढावल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अखेरच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला. यात ना चौकार मारला ना षटकार. पळून या धावा काढण्यात आल्या. एखाद्याला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं हे आपणाला व्हिडिओ पाहिल्यावर नक्की पटेल. अशक्य असं काहीच नाही असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्थानिक सामन्यातला किंवा गावात खेळल्या जाणाऱ्या सामन्यातला हा व्हिडिओ असावा.
शेवटच्या चेंडूवर 5 धावा धावा हव्या असताना सामना जिंकल्याचा दावा शेअर केला जातोय. दावा खरा आहे असं मानलं तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही की सामन्यात असंही काही होऊ शकतं. वाचा : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी