लंडन, 5 जुलै: भारतीय महिला टीमचे (India Women Team) हेड कोच म्हणून रमेश पोवार (Ramesh Powar) यांची नियुक्ती झाल्यापासून एकच प्रश्न विचारला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर इंग्लंड दौऱ्यात मिळालं आहे. टीम इंडियाची कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) बरोबर झालेल्या मतभेदामुळे पोवार यांनी 2018 साली राजीनामा दिला होता. आता नव्या इनिंगमध्ये पोवार मितालीशी जुळवून घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी दोघांनीही जुना वाद विसरुन पुढे जाण्याचे संकेत दिलं होते. पोवारनं केली प्रशंसा इंग्लंड विरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर पोवार यांचं मितालीबद्दलचं मत बदलल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयनं एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये पोवार यांनी मितालीच्या खेळाबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. “कॅप्टन मिताली राज पूर्णपणे प्रशंसेला पात्र आहे. ती खेळाची खरी दूत आहे. 22 वर्ष क्रिकेट खेळणे हे अनेक मुलींना प्रेरणा देणारे आहे. तिनं एकटीच्या बळावर आम्हाला मॅच जिंकून दिली. स्लो पिचवर 220 रनचा पाठलाग करणे सोपे नव्हते. मितालीच्या खेळामुळे आम्हाला विजय मिळाला.’’ अले पोवारनं यावेळी सांगितले.
स्नेह राणामुळे प्रभावित टीम इंडियाची ऑल राऊंडर स्नेह राणानं (Sneh Rana) तिसऱ्या वन-डेमध्ये 22 बॉलमध्ये 24 रनची खेळी करत टीमला मॅच जिंकून दिली. पोवारनं तिच्याबद्दल सांगितलं की, “स्नेह राणा ही नवी खेळाडू या मालिकेतून मिळाली आहे. साऊथम्पटनमध्ये तिने ज्या पद्धतीनं सरावात कामगिरा केली त्यानंतर तिला संधी द्यावी असं आम्हाला वाटले. स्नेहनं तिचं काम चोख केलंय याचा मला आनंद आहे. ‘शास्त्रीनंतर द्रविडला टीम इंडियाचा कोच करावं का?’, कपिल देवनं दिलं उत्तर ऑ मी देखील ऑफ स्पिनर होतो. त्यामुळे मी तिच्या खेळाबद्दल अधिक चांगले सांगू शकतो. ती अवघड परिस्थितीमध्ये चांगला खेळ करणारी खेळाडू आहे. या पद्धतीच्या खेळाडूची आम्हाला गरज होती. आगामी काळातील मोठ्या मालिकेत याच प्रकारच्या खेळाडूंची आवश्यकता आहे.” असे पोवार यांनी स्पष्ट केले.