मुंबई, 21 जानेवारी : ओमानमधील मस्कतमध्ये निवृत्त क्रिकेटपटूंची लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये इंडिया महाराजा टीमने आशिया लॉयन्सचा (India Maharaja vs Asia Lions) टीमचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर महाराजा टीमला एक धक्का बसला आहे. या टीमचा प्रमुख खेळाडू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) कोरोनाची लागण झाली आहे. हरभजनने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला घरात वेगळं केलं आहे. तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत, त्यांनी लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. कृपया सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या.’ असं आवाहन हरभजननं केलं आहे.
हरभजनला कोरोना झाल्याने गुरुवारी सुरू झालेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेला मोठा धक्का बसू शकतो. या स्पर्धेतील हरभजनच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता तातडीने तपासणी करावी लागणार आहे. अर्थात गुरूवारच्या मॅचमध्ये हरभजन खेळला नव्हता. ‘टीम इंडियाची 2 गटामध्ये विभागणी, विराट आणि राहुल ड्रेसिंग रूममध्ये वेगळे बसले,’ नव्या दाव्यानं खळबळ हरभजननं काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भविष्यात पंजाबची सेवा करण्याचा संकल्प त्याने बोलून दाखवला आहे. त्यानंतर तो राजकारणात उतरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, पण भज्जीने आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी अद्याप संलग्न नसल्याचे स्पष्ट केले आहे.