JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO: दुखापतीनंतर परतलेल्या जोफ्रा आर्चरनं घेतली भन्नाट विकेट, बॅट्समन फक्त बघत बसला

VIDEO: दुखापतीनंतर परतलेल्या जोफ्रा आर्चरनं घेतली भन्नाट विकेट, बॅट्समन फक्त बघत बसला

जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) खेळता आलं नाही. आर्चरनं कौंटी मॅचमध्ये टाकलेला भन्नाट बनाना स्विंग (banana swing) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 8 मे : जगातील सर्वात खतरनाक फास्ट बॉलरपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरला (Jofra Archer)  दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) खेळता आलं नाही. त्यानं आता इंग्लिंश कौंटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. आर्चरनं कौंटी मॅचमध्ये टाकलेला भन्नाट बनाना स्विंग  (banana swing) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. आर्चर कौंटीमध्ये ससेक्स टीमकडून खेळत आहे. सरे विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं जोरदार बॉलिंग केली. यावेळी त्यानं बॉल चांगल्या  पद्धतीनं स्विंग केला. त्यानं सरेचा बॅट्समन रिफरला बनाना स्विंगवर आऊट केलं. त्यानं टाकलेल्या बॉलवर बॅट्समनचा विश्वासच बसला नाही.

संबंधित बातम्या

इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण आर्चरचा हवेत स्विंग झालेला बॉल बॅट्समनला समजलाच नाही आणि तो एलबीडब्ल्यू (LBW) आऊट झाला. या मॅचमध्ये आर्चरनं बॅटींगमध्येही चांगली कामगिरी केली. त्यानं 46 बॉलमध्ये 35 रन काढले यामध्ये 3 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. न्यूझीलंडची टीम इंग्लंड विरुद्ध पुढच्या महिन्यात टेस्ट मालिका (New Zealand vs England Test Series 2021) खेळणार असून या मालिकेसाठी आर्चरचा फॉर्म इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या