मुंबई, 7 फेब्रुवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 6 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयात लेग स्पिनर युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) महत्त्वाचे योगदान होते. चहलनं 4 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला 176 रनवर रोखले. या कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देखील देण्यात आला. या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युजवेंद्र चहल यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका सुरू असतानाच याच आठवड्यात आयपीएल स्पर्धेचे मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) होणार आहे. युजवेंद्र चहलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात मुंबई इंडियन्समधून (Mumbai Indians) केली. त्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा सदस्य आहे. चहलला या सिझनपूर्वी आरसीबीने रिटेन केलेले नाही. त्यामुळे तो आयपीएल लिलावासाठी उपलब्ध आहे. रोहितनं मॅच संपल्यानंतर चहलची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याने सुरूवातीला वन-डे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेतल्याबद्दल चहलला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तू काही काळ टीमचा सदस्य नव्हतास तेव्हा काय केलंस? असा प्रश्न विचारला. त्यावर चहलनं ‘मी अँगलमध्ये काही बदल केले. विशेषत: स्लो विकेट डोळ्यासमोर ठेवून त्यामध्ये बदल केला. मी माझ्या बॉलिंगमध्ये काय सुधारणा करता येतील याचा विचार केला. असे चहलने सांगितले.
चहलच्या या उत्तरानंतर रोहितनं महत्त्वाचे संकेत दिले. ‘तू आमचा प्रमुख खेळाडू आहेस. तू त्याच मानसिकतेमधून खेळावं अशी माझी इच्छा आहे. खेळात चढ-उतार होतात. पण योग्य मानसिकता महत्त्वाची आहे. आयपीएल ऑक्शन येत आहे, तर गुड लक.’ असे रोहितने सांगितले. Ranji Trophy : हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय, गांगुलीच्या सूचनेकडं दुर्लक्ष रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर मुंबई इंडियन्स आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये खरेदी करण्याबात विचार करत आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.