मुंबई, 31 जानेवारी: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auction) वेध लागले आहेत. या ऑक्शनपूर्वी होणाऱ्या सर्व सामन्यात दमदार खेळ करत आयपीएल टीमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न खेळाडूंचा सुरू आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) खेळणाऱ्या अनेक विदेशी खेळाडूंचे आयपीएल हे मुख्य लक्ष्य आहे. रविवारी झालेल्या एका मॅचमध्ये 3 जणांनी दमदार बॅटींग करत दावेदारी सादर केली आहे. वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford) पेशावर जाल्मीकडून खेळत आहे. इस्लामाबाद युनायटेट विरूद्धच्या मॅचमध्ये (Peshawar Zalmi vs Islamabad United) पेशावरची अवस्था 4 आऊट 35 अशी होती. त्यानंतर रदरफोर्डनं 46 बॉलमध्ये नाबाद 70 रन काढले. यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. रदरफोर्डच्या खेळीमुळे पेशावरनं 6 आऊट 168 रन केले. बेन कटिंगनं 17 बॉलमध्ये नाबाद 26 रन काढले.
इस्लामाबाद युनायटेडनं 169 रनचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) या ओपनिंग जोडीनं 9.4 ओव्हरमध्ये 112 रनची भागिदारी केली. स्टर्लिंग 25 बॉलमध्ये 57 रन काढून आऊट झाला. तर हेल्स 54 बॉलमध्ये 82 रन काढून नाबाद राहिला. इस्लामाबादनं 15. 5 ओव्हर्समध्येच हे टार्गेट पूर्ण करत पेशावरचा 9 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. PSL 2022 : बाबर आझम सलग तिसऱ्या मॅचमध्ये फेल, 20 वर्षांच्या मुलापेक्षाही खराब खेळ या दमदार खेळीमुळे रजरफोर्ड, स्टर्लिंग आणि हेल्स या तीन्ही खेळाडूंना आयपीएल लिलावात चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे. यंदाचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.