मुंबई, 2 मार्च : आयपीएलमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेला सुरेश रैना (Suresh Raina) यंदाच्या ऑक्शनध्ये (IPL Auction 2022) अनसोल्ड होता. रैनाला या सिझनपूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मुक्त केले होते. त्यानंतर त्याला चेन्नईसह एकाही आयपीएल टीमनं खरेदी केले नाही. सध्या रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on social media) होत आहे. या फोटोत रैना गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसत असून त्याची आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री होणार आहे, असा दावा केला जात आहे. गुजरातचा ओपनिंग बॅटर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमधून नाव मागं घेतलं आहे. त्यामुळे रॉयच्या जागी रैनाचा समावेश होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच क्रिकेट फॅन्सनी टायटन्सच्या जर्सीमध्ये रैनाचा फोटो एडिट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. रैना होता गुजरातचा कॅप्टन जेसन रॉयनं बायो-बबलमध्ये दीर्घकाळ राहावं लागत असल्यानं येणाऱ्या थकव्याचं कारण देत या स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. रॉयच्या जागी रैनाचं नाव चर्चेत येण्याचं एक खास कारण आहे. रैनानं आयपीएलमध्ये यापूर्वी गुजरातच्या टीमची कॅप्टनसी केली आहे.
रोहित शर्मानं खरेदी केली Lamborghini Urus, किंमत वाचून बसेल धक्का!
स्पॉट फिक्सिंगच्या कारणामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुजरात लॉयन्स ही टीम आयपीएलमध्ये होती. रैनानं लॉयन्स टीमची कॅप्टनसी केली आहे. यामुळेच जेसन रॉयनं आगामी सिझनमधून माघार घेताच त्याच्या जागी रैनाचे नाव चर्चेत आरे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टीमचा कॅप्टन असून या टीममध्ये शूभमन गिल, राशिद खान आणि मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.