JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला बसणार मोठा धक्का, बडा खेळाडू सोडणार साथ

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला बसणार मोठा धक्का, बडा खेळाडू सोडणार साथ

आयपीएलमध्ये दोन नव्या टीम दाखल होताच आता पुढील वर्षीच्या सिझनची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिझनपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर: आयपीएलमध्ये दोन नव्या टीम दाखल होताच आता पुढील वर्षीच्या सिझनची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिझनपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या ऑक्शनसाठी किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही. 3 किंवा 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी बीसीसीआय देईल असं वृत्त आहे. त्यानुसार सर्व फ्रँचायझींनी कोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल याची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला वगळणार अशी बातमी आहे. त्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) कॅम्पमधून एक मोठं वृत्त आहे. दिल्लीचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टीममधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. श्रेयस मागील आयपीएल सिझनमपर्यंत दिल्लीचा कॅप्टन होता. या सिझनपूर्वी त्याला दुखापत झाल्यानं ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टन करण्यात आलं. आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये श्रेयस परतला, पण तरीही दिल्लीनं पंतलाच कॅप्टन म्हणून कायम ठेवलं. त्याच्या कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. आता पुढील सिझनमध्येही पंतच दिल्लीचा कॅप्टन राहणार आहे. श्रेयसची नजरही कॅप्टनसीवर आहे. लखनऊ किंवा अहमदाबाद या नव्या टीमचा तो कॅप्टन होऊ शकतो. त्यामुळे तो पुढील सिझनमध्ये दिल्लीची साथ सोडणार आहे. IPL 2022: मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला वगळणार! ‘या’ 3 खेळाडूंना देणार पसंती नव्या टीमला मिळणार संधी आयपीएलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय 2 नव्या फ्रँचायझींना आयपीएल ऑक्शनपूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्याच्या विचारात आहे. ’ नव्या टीमला त्यांचा कोर तयार करण्याची संधी दिली पाहिजे. ही संधी उपलब्ध व्हावी म्हणून मार्ग काढणे आवश्यक आहे. ज्यामध्ये खेळाडूंची फिस तसंच विशेष खेळाडूंना ऑक्शनपूर्वी निवडण्याची संधी याचा समावेश असेल. जुन्या टीमकडं खेळाडूंना रिटेन करण्याचा पर्याय असेल. त्यामुळे नव्या टीमला ही संधी देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.'

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या