JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : जोश हेजलवूडची जागा कोण घेणार? CSK च्या टीम मॅनेजमेंटनं दिलं उत्तर

IPL 2021 : जोश हेजलवूडची जागा कोण घेणार? CSK च्या टीम मॅनेजमेंटनं दिलं उत्तर

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazlewood ) याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं हेजलवूडच्या जागी कुणाची निवड करणार याबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazlewood ) याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धा सुरु होण्यास एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना हेजलवूडनं हा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयानं चेन्नईच्या टीमला धक्का बसला आहे. मागच्या वर्षी देखील आयपीएलपूर्वी सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग (Harbhjan Singh) या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याचा फटका चेन्नईला बसला. त्यांना पहिल्यांदा स्पर्धेची ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आले होते. हेजलवूडची जागा कोण घेणार? सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना हेजलवूडची जागी कुणाची निवड करणार याबाबत माहिती दिली आहे. ‘ही अचानक घडलेली घटना आहे. आम्ही यासाठी तयार नव्हतो. आता पुढील निर्णय घेण्यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या पर्यांयाचा विचार करणार आहोत. पण, आम्ही सर्व बाजू कव्हर केल्या आहेत. कोणत्याही बदली खेळाडूची गरज नाही, असं टीम मॅनेजमेंटला वाटत असेल तर आम्ही कुणाचाही समावेश करणार नाही,’ असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. हेजलवूडनं माघार का घेतली? हेजलवूडनं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. ‘बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,’ असे त्याने स्पष्ट केले. ‘आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील.  या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे हेजलवूडने सांगितले. ( वाचा :  एकही मॅच न खेळता श्रेयस अय्यरला मिळणार 7 कोटी! वाचा काय आहे कारण  ) आयपीएलमधून माघार घेणारा हेजलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. यापूर्वी जोश फिलिपे आणि मिचेल मार्श यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या