JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : मॅक्सवेल, जेमिसनवर RCB नं खर्च केले कोट्यवधी रुपये, विराटनं सांगितलं ‘हे’ कारण

IPL 2021 : मॅक्सवेल, जेमिसनवर RCB नं खर्च केले कोट्यवधी रुपये, विराटनं सांगितलं ‘हे’ कारण

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या या सिझनसाठी (IPL 2020) खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. आरसीबीला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या या सिझनसाठी (IPL 2020) खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. आरसीबीला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. विजेतेपदाची ही प्रतीक्षा संपवण्यासाठी आरसीबीनं यावेळी काही खेळाडूंना जबरदस्त बोली लावून खरेदी केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि न्यूझीलंडचा नवा स्टार खेळाडू कायले जेमिसन (Kyle Jamieson) यांना आरसीबीनं मोठी रक्कम देऊन खरेदी केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या लिलावावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला विराट? ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीनं 14 कोटी 25 लाख रुपयांना तर कायले जेमिसनला 15 कोटींना खरेदी केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर विराटचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये त्यानं नव्या खेळाडूंच्या निवडीवर समाधान व्यक्त केलं आहे.

(वाचा -  IPL Auction 2021 : 9.25 कोटींची बोली, या खेळाडूच्या आई-वडिलांना अश्रू अनावर )

“आयपीएल ऑक्शनचा निकाल चांगला होता. त्यामुळे मी आनंदी आहे. आम्हाला ज्या प्रकारची टीम, जसं संतुलन हवं होतं ते मिळालं आहे. आमच्यासाठी मागचा सिझन चांगला होता. यंदा नवे खेळाडू आणि नव्या अपेक्षांसह आम्ही आगेकूच करणार आहोत. आरसीबीच्या फॅन्सनी येत्या सिझनमध्येही आम्हाला पाठिंबा द्यावा. असं आवाहन मी करत आहे,’’ अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे.

संबंधित बातम्या

आरसीबीनं या सिझनसाठी मॅक्सवेल आणि जेमिसन शिवाय डॅनियल ख्रिस्टीन, मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन बेबी, सुयश प्रभूदेसाई, केएस भरत आणि रजत पाटीदार या खेळाडूंना करारबद्ध केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या