JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: विराट कोहलीला मदत करण्यास RCB च्या खेळाडूचा नकार, हे आहे कारण

IPL 2021: विराट कोहलीला मदत करण्यास RCB च्या खेळाडूचा नकार, हे आहे कारण

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (WTC) तयारी करत आहे. विराटला या सरावात मदत करण्यासाठी जेमीसननं नकार दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 29 एप्रिल: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (WTC) तयारी करत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जूनमध्ये ही स्पर्धा होणार आहे. विराट कोहली या स्पर्धेसाठी सराव करत असताना त्याचा आरसीबीमधील सहकारी आणि न्यूझीलंडचा फास्ट बॉलर कायले जेमिसन (Kyle Jameson) याने नकार दिला आहे. आरसीबीचा ऑल राऊंडर डॅन ख्रिस्टीननं (Dan Christian) हा खुलासा केला आहे. जेमिसन स्वत: बरोबर अभ्यासासाठी दोन ड्यूक बॉल घेऊन आल्याचंही ख्रिस्टीननं सांगितलं आहे. डॅन ख्रिस्टीननं एका यूट्यूब चॅनलशी बोलताना  या बाबत सांगितलं की, “आम्ही पहिल्या आठवड्यापासून इथं आहोत. आम्ही तिघं (कोहली, जेमीसन आणि ख्रिस्टीन) नेट सेशननंतर बसलो होतो. ते दोघं टेस्ट क्रिकेटबद्दल बोलत होते. विराट त्याला म्हणाला, जेमी (कायले जेमीसन) तू ड्यूक बॉलनं बरीच बॉलिंग केली आहेस. त्यावर जेमीनं माझ्याकडं दोन ड्यूक बॉल असून मला या बॉलनं सराव करायचा आहे, असं सांगितलं. त्यानंतर विराट जेमीला म्हणाला " तू मला नेट्समध्ये त्या बॉलनं बॉलिंग करशील का? तुझी बॉलिंग खेळायला मला आवडेल.”

“विराटनं हा प्रस्ताव ठेवताच  तुला बॉलिंग करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा आशयचं उत्तर जेमीसननं दिलं. त्याला (विराट) ड्यूक बॉलनं जेमीसनच्या बॉलिंगचा अंदाज घ्यायचा होता,” असा दावा ख्रिस्टीननं केला आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियानं न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी जेमीसननं कोहलीसह सर्वच भारतीय बॉलर्सची भंबेरी उडवली होती. विराट, डीव्हिलियर्सला सॅल्यूट! दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्यासाठी केला VIDEO न्यूझीलंडच्या कायले जेमिसनसाठी आरसीबीनं तब्बल 15 कोटींची किंमत मोजली आहे. त्यानं या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 6 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या