JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: T20 वर्ल्ड कपने सर्व आयपीएल फ्रँचायझींची चिंता वाढली

IPL 2021: T20 वर्ल्ड कपने सर्व आयपीएल फ्रँचायझींची चिंता वाढली

आयसीसीनं टी20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या वर्ल्ड कपसाठी सर्व देशांचे खेळाडू सप्टेंबर महिन्याच्या शेवटीच युएईमध्ये दाखल होतील. बीसीसीआयनं अद्याप आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर न केल्यानं सर्व आयपीएल फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जून: आयसीसीनं (ICC) मंगळवारी टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) तारखांची घोषणा केली आहे. 17 ऑक्टोबरपासून हा वर्ल्ड कप यूएई आणि ओमानमध्ये सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपच्या पूर्वीच आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातमध्ये सुरु असलेला आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक स्थगित करावा लागला होता. आयसीसीनं टी20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या वर्ल्ड कपसाठी सर्व देशांचे खेळाडू सप्टेंबर महिन्याच्या शेवटीच युएईमध्ये दाखल होतील. त्यामुळे या कालावधीत यूएईतील हॉटेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यातच बीसीसीआयनं अद्याप आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर न केल्यानं सर्व आयपीएल फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना व्हायरसमुळे 21 जूलैपर्यंत भारतामधून यूएईला जाणारी विमान स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससह (CSK) अन्य फ्रँचायझींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीएसकेचे सीईओ के. विश्वनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा सुरु होण्यास आता फक्त 2 महिने बाकी आहेत. त्यापूर्वी विमानसेवा बंद असल्यानं खेळाडूंच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच 1 ऑक्टोबरपासून दुबई एक्सपो सुरु होणार आहे. त्याला जगभरातून लाखो जण येण्याची अपेक्षा आहे. या दुबई एक्स्पोमुळे हॉटेल मिळण्यासाठी फ्रँचायझींना त्रास होऊ शकतो. तो त्रास टाळण्यासाठी सीएसके मॅनेजमेंटनं यूएईतील हॉटेलशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. WTC चे नवे नियम जाहीर, ‘ही’ चूक केली तर फायनलची संधी जाणार पंजाब किंग्ज सज्ज पंजाब किंग्जच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, “ विमान सेवा बंद असली तरी आम्ही तयारी सुरू केलेली आहे. आम्हाला बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आम्हाला मीडियामधूनच बातम्या समजल्या आहेत. बीसीसीआय ज्या तारखांची घोषणा करेल, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमची हॉटेलची तयारी अंतिम टप्प्यात आहे.” असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या