JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 भोवती वाढतोय कोरोना विळखा, आता RCB च्या बड्या खेळाडूला लागण

IPL 2021 भोवती वाढतोय कोरोना विळखा, आता RCB च्या बड्या खेळाडूला लागण

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या भोवती कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 4 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या भोवती कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा (Nitish Rana) आणि दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल (Axar Patel) यांना कोरोनाची लागण झाल्याचं यापूर्वीच उघड झालं आहे. आता त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाली आहे. पडिक्कलला आता इतर खेळाडूंपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. आरसीबीची पहिली मॅच ही 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे. देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं सर्वांना प्रभावित केलं. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतही त्यानं 147. 40 च्या सरासरीनं 737 रन काढले होते. यामध्ये चार सलग शतकांचाही समावेश आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या देवदत्तला कोरोना झाल्यानं आरसीबीच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. तो RCB च्या पहिल्या दोन मॅच खेळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी टीम इंडियाचा ऑल राऊंडर आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा प्रमुख खेळाडू असलेला अक्षर पटेल (Axar Patel) देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला  होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा बॅट्समन नितीश राणा याला कोरोनाची लागण झाली होती. ( वाचा :  IPL 2021: मुंबईतील मॅचवर कोरोनाचं सावट, BCCI नं केली मोठी घोषणा! ) नितीश राणाने 21 मार्चला मुंबईच्या केकेआरच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आला होता. हा रिपोर्ट 19 मार्चचा होता. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. यानंतर नितीश इतरांपासून वेगळा होत विलगिकरणात गेला. नितीश राणा आता पूर्ण बरा झाला असून त्यानं सरावाला देखील सुरुवात केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीममधील एका स्टाफचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या