JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021, RCB vs CSK: सलग दुसऱ्या पराभवानंतर विराट नाराज, टीमच्या अपयशाचं सांगितलं कारण

IPL 2021, RCB vs CSK: सलग दुसऱ्या पराभवानंतर विराट नाराज, टीमच्या अपयशाचं सांगितलं कारण

आयपीएल 201 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs CSK) 6 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीचा लीगच्या सेकंड हाफमधील हा सलग दुसरा पराभव आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : आयपीएल 201 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs CSK) 6 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीचा लीगच्या सेकंड हाफमधील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांचा 9 विकेट्सनं पराभव केला होता. या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहली नाराज झाला होता. त्यानं टीमच्या खराब कामगिरीचं कारण मॅचनंतर सांगितलं. विराट मॅचनंतर म्हणाला की, ‘पिच स्लो झाले होते. पण, माझ्या मते किमान 15 ते 20 रन कमी झाले. 175 रन जिंकण्यासाठी आवश्यक होते. त्याचबरोबर नंतर बॉलिंग देखील चांगली झाली नाही. आम्ही आवश्यकतेनुसार बॉलिंग करु शकलो नाही. वास्तविक सेकंड इनिंगमध्ये बॉलर्सना  पिचची मदत मिळत होती. मात्र आम्ही त्याचा वापर करु शकलो नाही. आमच्या बॉलर्सनी सहज रन दिले.’ एक्स फॅक्टर गायब होता आरसीबीच्या कॅप्टननं यावेळी सीएसकेच्या बॉलर्सची देखील प्रशंसा केली. ‘चेन्नईच्या बॉलर्सनी शेवटच्या ओव्हर्समध्ये यॉर्करचा चांगला वापर केला. त्यामुळे आम्हाला हवाई शॉट्स खेळणे अवघड झाले होते. आम्ही फक्त खराब बॉलवर फटकेबाजी करु शकलो. पण आमच्या बॉलर्सनी बरेच खराब बॉल टाकले. त्यांना फटकेबाजी करु न देण्याचं आमचं धोरण होतं, पण आम्ही तसं करु शकलो नाही,’ असे विराट यावेळी म्हणाला. धोनीच्या विरुद्ध महामुकाबल्यासाठी विराटची जय्यत तयारी, पाहा VIDEO पहिल्या 5 ओव्हर्समध्ये बॉलिंग करताना एक्स फॅक्टर गायब होता. कठिण परिस्थितीमध्ये चांगली बॉलिंग करण्याची गरज आहे, पण आम्ही तसं करु शकलो नाही. पहिल्या मॅचपेक्षा हा पराभव जास्त निराशाजनक आहे. कारण, ऐकेकाळी मॅचवर आमची मजबूत पकड होती, पण आम्ही ती गमावली.’ असे विराटने यावेळी स्पष्ट केले. व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण विराट- पडिक्कलचं अर्धशतक यापूर्वी विराट कोहली (53) आणि त्याचा ओपनिंग पार्टनर देवदत्त पडिक्कल (70) यांच्या चांगल्या खेळीनंतरही आरसीबीनं 6 आऊट 156 पर्यंतच मजल मारली. चेन्नईनं 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनं सर्वाधिक 38 रन काढले. तर सुरेश रैना 17 आणि महेंद्रसिंह धोनी 11 रन काढून नाबाद परतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या