मुंबई, 23 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीममध्ये (Indian Cricket Team) सध्या प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंत (Rishbah Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्यात विकेट किपरच्या जागेसाठी स्पर्धा आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2021) पंतचा बॅकअप विकेट किपर म्हणून इशान किशनची निवड झाली आहे. पण या दोघांनाही आव्हान देऊ शकेल असा एक नवा विकेट किपर बॅट्समन आता उदयाला आला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा विश्वास आहे. हा खेळाडू आहे केरळचा आक्रमक विकेट किपर - बॅट्समन मोहम्मद अझहरुद्दीन (Mohammed Azharuddeen). सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध 37 बॉलमध्ये शतक झळकावल्यानंतर अझर चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) या सिझनसाठी करारबद्ध केलं आहे. रहस्य उलगडलं : ‘या’ व्यक्तीच्या सल्ल्यानंतर विराट कोहलीनं सोडली कॅप्टनसी आरसीबीच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये अझरनं 43 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 66 रन काढत आपण आयपीएल खेळण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचवेळी त्याची एक बकेट लिस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील आयपीएल टीमचा सदस्य होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता रणजी क्रिकेटमध्ये 4 शतक आणि टीम इंडियासाठी 2023 चा वर्ल्ड कप खेळणं या आणखी दोन इच्छा आहेत.
अझरनं आजवर 22 प्रथम श्रेणी मॅच आणि 30 लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. 24 टी-20 मॅचमध्ये त्याने 142.27 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. त्याला बंगळुरूनं 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं आहे.