JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: राहुल द्रविडचा एक सल्ला, आणि चेतेश्वर पुजाराची बॅटींग बदलली

IPL 2021: राहुल द्रविडचा एक सल्ला, आणि चेतेश्वर पुजाराची बॅटींग बदलली

टीम इंडियाचा (Team India) टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) ओळख आहे. टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं श्रेय पुजारानं भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविडला (Rahul Dravid) दिलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : टीम इंडियाचा (Team India) टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) ओळख आहे. त्याचा मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचसाठी  विचार झालेला नाही.  यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे.  पुजारा सात वर्षानंतर यंदा आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) खेळणार आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्याला 50 लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं श्रेय पुजारानं भारताचा माजी कॅप्टन राहुल द्रविडला (Rahul Dravid) दिलं आहे. पुजारानं ‘क्रिकइन्फो’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये द्रविडला दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. ‘छोट्या फॉरमॅटमुळे टेस्ट क्रिकेटवर परिणाम होईल अशी भीती मला होती. त्यामुळे मी T20 क्रिकेटपासून दूर होतो. द्रविडनं समजवल्यानंतर मी या प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं,’ असं पुजारानं सांगितलं आहे. ‘यापूर्वी टी20 क्रिकेट खेळताना यामुळे माझं टेस्ट क्रिकेट प्रभावित होईल का? याचा विचार मी करत होतो. आयपीएल संपल्यानंतर माझं बॅटींगचं तंत्र कमकुवत होईल असं मला वाटत होतं. आता ही भीती संपली आहे. नेहमी नैसर्गिक खेळ केला  पाहिजे हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर शिकलो आहे. यामध्ये मला राहुल द्रविडनं खूप मदत केली. तुझा नैसर्गिक खेळ बदलणार नाही तर तू काही नवे शॉट्स शिकशील,’ असं द्रविडनं सांगितल्याचं पुजारानं स्पष्ट केलं. टी 20 क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा चेतेश्वर पुजारानं भारताकडून आजवर एकही आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळलेली नाही. तो आयपीएलमध्ये यापूर्वी 2014 साली किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडूनही पुजारा खेळला आहे. (  On This Day : जगाला पहिल्यांदा दिसली धोनीची पॉवर, पाकिस्तानची झाली होती वाताहत!  ) पुजारानं आयपीएलमध्ये एकूण 30 मॅच खेळल्या असून यामध्ये 99.74 च्या स्ट्राईक रेटनं 390 रन काढले आहेत. पुजारानं टी20 क्रिकेटमध्ये एक शतकही लगावलं आहे. सौराष्ट्रकडून 2019 साली खेळताना रेल्वेविरुद्ध त्यानं ही कामगिरी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या