मुंबई, 6 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) ओपनिंग बॅटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) जबरदस्त खेळामुळे सर्वांना प्रभावित केलं आहे. ऋतुराजनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) आयपीएल कारकिर्दीमधील पहिलं शतक झळकावलं आहे. तसंच तो सर्वाधिक रन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑरेंज कॅपच्या देखील शर्यतीमध्ये आहे. ऋतुराजच्या खेळाबरोबरच त्याच्या ‘लव्ह लाईफ’ ची देखील चर्चा सध्या जोरात आहे. ऋतुराजचं नाव मराठी अभिनेत्री सायली संजीवशी (Sayali Sanjeev) गेल्या काही महिन्यांपासून जोडलं जात आहे. सायलीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केल्यानंतर दोघांच्या रिलेशनीपबद्दल चर्चा सुरू झाली. सायलीच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स तसेच लाइक्सही दिले आहे. पण यातील सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी कमेंट होती ती क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याची. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर “Woahh” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे सायली आणि ऋतुराज या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
सायलीनंही ऋतुराजच्या फोटोवर हार्टची इमोजी अशी होती. तेव्हा आता हा कमेंट्सचा खेळ नक्की काय आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सायलीनं एका म्युझिक व्हिडोओच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. ‘काहे दिया परदेस’ (Kahe diya pardes) या मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील गौरी हे पात्र तिनं रंगवले होते. जे चांगलेच गाजले. सायलीनं काही सिनेमांमध्येही काम केले आहे. यामध्ये राजू पारसेकर यांचा पोलीस लाईन्स - एक पूर्ण सत्य याचा समावेश आहे. सायलीकडं सध्या अतपदी नाईट्स, द स्टोरी ऑफ पैठणी, मन फकीरा आणि एबी अँड सीडी हे सिनमे आहेत. IPL 2021: विराटमुळे वाढलं धोनीचं टेन्शन! 3 दिवस ठरणार निर्णायक ऋतुराजन फेटाळली होती चर्चा सायलीबद्दल अफेयरच्या चर्चेनं जोर पकडताच ऋतुराजनं इन्स्टाग्रामवरुन स्पष्टीकरण दिले होते. ‘माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. ते देखील क्लीन बोल्ड. बाकी कुणी नाही.’ असं ऋतुराजनं म्हटंल होतं. ऋतुराज सध्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. चेन्नई सुपर किंग्सची पुढील लढत गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध होत आहे. टॉप 2 मधील जागा कायम राखण्यासाठी चेन्नईला ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.