मुंबई, 24 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत आज (शुक्रवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) हा महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाच्या आजी आणि माजी कॅप्टनमधील या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. विशेषत: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीसाठी ही मॅच विशेष महत्त्वाची आहे. या लढतीसाठी आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) जय्यत तयारी केली आहे. विराट कोहलीनं त्याच्या जिममधील व्यायामाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक चॅम्पियन खेळाडू मॅचपूर्वी स्वत:ला कसं तयार करतो हे पाहायला मिळतं. विराट यामध्ये त्याच्या स्नायूंचा व्यायाम करत आहे. क्रिकेट फॅन्समध्ये हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत 22 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. विराटवर सध्या चांगल्या कामगिरीसाठी दबाव आहे. आयपीएलच्या सेकंड हाफची सुरुवात त्यानं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करत केली. त्यानंतर कोलकाता विरुद्ध तो फक्त 5 रन काढून आऊट झाला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धही टीमचा पराभव झाला तर विराटची कॅप्टनसी जाऊ शकते असं वृत्त आहे. RCB मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार? आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये विराटनं 7 मॅचमध्ये 198 रन केले. त्यामध्ये फक्त 1 अर्धशतकाचा समावेश आहे. तसंच त्याचा स्ट्राईक रेट 120 च्या आसपास आहे. ओपनिंग केल्यानंतरही त्याची सरासरी 30 पर्यंत घसरली आहे. त्यामुळे विराटसाठी चेन्नई विरुद्धची लढत ‘करो वा मरो’ स्वरुपातील आहे. RCB vs CSK: धोनी सेनेला हरवण्यासाठी विराटला पार करावी लागणार 5 आव्हानं आरसीबीची संभाव्य Playing 11 : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कॅप्टन), केएस भरत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, सचिन बेबी, वानिन्दु हसरंगा, काइल जेमिसन, हर्षल पटेल/नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल. सीएसकेची संभाव्य Playing 11: ऋतुराज गायकवाड़, फाफ ड्यू प्लेसी, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन आणि विकेट किपर), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड.