JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : या सीझनमध्ये हे पाच खेळाडू करणार त्यांच्या कर्णधारापेक्षाही अधिक कमाई

IPL 2020 : या सीझनमध्ये हे पाच खेळाडू करणार त्यांच्या कर्णधारापेक्षाही अधिक कमाई

नेहमीच्या हंगामाप्रमाणे यावर्षी देखील महागड्या खेळाडूबाबत IPL 2020 मध्ये चढाओढ पाहायला मिळाली. दरम्यान काही खेळाडू असे आहेत की ते कर्णधारापेक्षाही अधिक कमाई करणार आहेत.

0106

आयपीएलचा नवा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान काही खेळाडू असे आहेत की ते कर्णधारापेक्षाही अधिक कमाई करणार आहेत.

जाहिरात
0206

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे, त्याच्यावर 7 कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र या संघात काही खेळाडू आहेत, जे त्याच्यापेक्षा अधिक मानधन घेतात. यामध्ये पहिले नाव ऋषभ पंतचे आहे, जो 15 कोटींची कमाई करणार आहे. त्याची ही रक्कम रोहित शर्मा आणि महेद्रसिंह धोनीइतकीच आहे.

जाहिरात
0306

किंग्ज इलेव्हन पंजाबचा माजी कर्णधार आर अश्विन याला देखील दिल्लीने 7.60 कोटी रुपयांमध्ये संघात सामील करून घेतले आहे. अश्विनची कमाई देखील अय्यरपेक्षा अधिक आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)

जाहिरात
0406

दिल्ली कॅपिटल्समधील शॅमरॉन हेटमेयर देखील कर्णधार श्रेयस अय्यर पेक्षा अधिक मानधन घेतो. टीमने 7.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला टीममध्ये घेतले आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)

जाहिरात
0506

कोलकाता नाइट रायडर्सने गेल्या वर्षी झालेल्या या ऑक्शनमध्ये पॅट कमिन्सला सर्वाधिक किंमत मोजत संघात घेतले होते. 15.50 कोटी रुपयांची बोली संघाने त्याच्यावर लावली आहे. दरम्यान संघाच्या कर्णधार दिनेश कार्तिकवर 7.40 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात समाविष्ट करण्यात आले होते. (फोटो सौजन्य- Twitter)

जाहिरात
0606

कोलकाताने आंद्रे रसेलला 8.50 कोटी रुपयात खरेदी केले आहे. 2019 मध्ये त्याची कामगिरी धडाकेबाज राहिली आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या