JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: पहिल्या मॅचमधील पराभवानंतर धोनीला आणखी एक मोठा धक्का!

IPL 2021: पहिल्या मॅचमधील पराभवानंतर धोनीला आणखी एक मोठा धक्का!

चेन्नईचं 189 रनचं आव्हान दिल्लीनं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर दिल्लीनं आरामात पूर्ण केलं. चेन्नई आणि कॅप्टन धोनी (MS Dhoni) दोघांसाठीही ही मॅच निराशाजनक ठरली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल :  ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) या आयपीएल सिझनची (IPL 2021) सुरुवात यशस्वी केली आहे. दिल्लीनं महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सात विकेट्सनं पराभव केला. चेन्नईचं 189 रनचं आव्हान दिल्लीनं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर दिल्लीनं आरामात पूर्ण केलं. चेन्नई आणि कॅप्टन धोनी दोघांसाठीही ही मॅच निराशाजनक ठरली. कॅप्टन धोनी शून्यावर आऊट झाला. तर मॅचनंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं धोनीला दंडही आकारला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे धोनीला 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक टीमला 90 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण करणे बंधनकारक आहे. चेन्नईच्या टीमला ही मर्यादा पाळता आली नाही, त्यामुळे बीसीसीआयनं धोनीच्या मॅच फिसमधील 12 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पराभवानंतर काय म्हणाला धोनी? पहिल्या मॅचमधील पराभवानंतर बॉलर्सनी धडा घ्यायला हवा, असं मत धोनीनं व्यक्त केलं आहे. “बॉलर्सनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलं नाही. त्यांनी खराब बॉलिंग केली. त्यांनी या पराभवानंतर धडा घेतला आहे. आता ते पुढील मॅचमध्ये चांगली कामगिरी करतील,” असं धोनीनं सांगितलं. (वाचा :  IPL 2021 : धोनीच्या पदरी पुन्हा निराशा, 6 वर्षात पहिल्यांदाच केला नकोसा विक्रम  ) “ड्यूवर बरंच काही अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही जास्त रन करायला हवे होते,’’ हे देखील धोनीनं मान्य केलं. चेन्नईची पुढील मॅच 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या