JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध कट! अंपायरमुळे शतक न झाल्याचा कॅप्टनचा मोठा आरोप

इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध कट! अंपायरमुळे शतक न झाल्याचा कॅप्टनचा मोठा आरोप

टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्नेह राणानं (Sneh Rana) शेवटच्या दिवशी नाबाद 80 रन काढले होते. अंपयारनं खेळ थांबवल्यानं तिला शतक पूर्ण करता आले नाही. या प्रकरणात कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) मोठा गौप्यस्फोट केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENGW) होणारी एकमेव टेस्ट 16 ते 19 जूनच्या दरम्यान झाली. भारतीय महिलांनी ‘फॉलो ऑन’ नंतरही जबरदस्त खेळ करत ती टेस्ट ड्रॉ केली.  टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्नेह राणानं (Sneh Rana) मॅचच्या शेवटच्या दिवशी नाबाद 80 रन काढले होते. अंपयारनं खेळ थांबवल्यानं तिला शतक पूर्ण करता आले नाही. या प्रकरणात कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) मोठा गौप्यस्फोट केला आहे. काय होता कट? भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेला रविवारी सुरुवात होत आहे. त्यापूर्वी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मितालीनं हा आरोप केला. “आम्हाला बॅटींग करायची होती. आम्ही इंग्लंडच्या कॅप्टनला देखील ते सांगितले होते. त्याचवेळी मी बेल्स काढलेले पाहिले. स्नेह राणानं सांगितलं की, खराब प्रकाशामुळे अंपायरनं हा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही टीमनं एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ही मॅच संपली असं त्यांना वाटलं” ब्रिस्टल टेस्टमध्ये इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 366 रन काढले होते. त्याला उत्तर देताना टीम इंडियाची पहिली इनिंग 231 रनवर संपुष्टात आली. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 8 आऊट 344 रन काढले. यावेळी सलग चार टेस्ट जिंकण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाला करता आला नाही. यापूर्वी झालेल्या तीन टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या होत्या. मुंबईच्या सूर्याची ‘दादा’गिरी, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर केला व्यायाम, पाहा VIDEO पाच जणींचे पदार्पण भारतीय महिलांनी यंदा सात वर्षांनी टेस्ट मॅच खेळली. या टेस्टमध्ये शफाली वर्मा, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि तानिया भाटीया या 5 जणींनी पदार्पण केले. शफालीनं दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. स्नेह राणानं 4 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 80 रनची नाबाद खेळी केली. दीप्ती शर्मानं 3 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं. तानिया भाटीयानंही दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 44 रन काढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या