JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO

टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO

इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 नोव्हेंबर :  इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे. शार्दुलनं रविवारी त्याची गर्लफ्रेंड मिताला परुळकर (Mittali Parulkar) बरोबर साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला शार्दुलचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. एखादा भारतीय क्रिकेटपटू या कार्यक्रमाला उपस्थित होता का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर शार्दुल लग्न करण्याची शक्यता आहे.

30 वर्षांचा शार्दुलला सध्या ब्रेक देण्यात आला आहे.  त्यानं आजवर 4 टेस्ट, 15 वन-डे आणि 24 टी20 मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचाही तो सदस्य आहे. त्याचबरोबर तो टी20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतही खेळला आहे. शार्दुलनं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. IPL गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूनं केलं लग्न, ऋषभ पंतनं लावली हजेरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या