JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND W vs AUS W : स्मृती मंधाना फॉर्मात परतली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली दमदार खेळी

IND W vs AUS W : स्मृती मंधाना फॉर्मात परतली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली दमदार खेळी

गेल्या काही मॅचपासून फॉर्मात नसलेली भारताची अनुभवी बॅटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) दमदार खेळी करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर : गेल्या काही मॅचपासून फॉर्मात नसलेली भारताची अनुभवी बॅटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) दमदार खेळी करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये (Indian Women vs Australia Women) स्मृतीनं 86 रनची दमदार खेळी केली. स्मृतीला मागच्या 9 मॅचमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावता आलं होतं. त्यामुळे तिच्यावर टीका होत होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये टॉस गमावल्यानंतर भारतीय टीम पहिल्यांदा बॅटींगला उतरली. स्मृतीनं शफाली वर्मा (Shafali Verma) सोबत पहिल्या विकेटसाठी 74 रनची दमदार पार्टनरशिप केली. शफाली मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच 22 रन काढून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राज (Mirhali Raj) 8 रन काढून रन आऊट झाल्यानं भारतीय टीमला मोठा धक्का बसला. मिताली पाठोपाठ यास्तिका भाटिया देखील झटपट आऊट झाल्यानं भारताची अवस्था 3 आऊट 95 अशी झाली होती. त्यानंतर स्मृतीनं विकेटकिपर रिचा घोष (Richa Ghosh) सोबत चौथ्या विकेट्ससाठी 76 रनची पार्टनरशिप केली. या दरम्यान स्मृतीनं तिच्या वन-डे कारकिर्दीमधील 19 वं अर्धशतक देखील पूर्ण केलं. ती शतक झळकावेल असं वाटत असतानाच 86 रन काढून आऊट झाली. स्मृतीनं 94 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीनं ही खेळी केली.

संबंधित बातम्या

धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे टीम इंडियानं जिंकला होता World Cup, 14 वर्षांनी पुन्हा इतिहास रचण्याची संधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन-डे मॅचच्या या सीरिजमधील पहिली वन-डे ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. त्यामुळे आता या सीरिजमधील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय टीमला ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या