त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुले रद्द झाला. आता दुसरा सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. गयानातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाने 13 षटके फलंदाजी केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतनं टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. हाच फॉर्म वनडेतही कायम राखण्यासाठी ऋषभ पंत उत्सुक आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये पंत हॉटेलच्या मोकळ्या पॅसेजमध्ये सराव करताना दिसत आहे. पंतनं शेअर केल्या व्हिडिओत त्याच्यासोबत कुलदीप यादव दिसत आहे. हॉटेलच्या मोकळ्या पॅसेजमध्ये कुलदीप गोलंदाजी करत असून पंत यष्टीरक्षणाचा सराव करत आहे. पंतनं हा व्हिडिओ शेअर करताना लिहलं आहे की, कुठं, कधी, काय आणि कोण… नो सॉरी.. का ते फक्त मला माहीती आहे.
टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतनं 42 चेंडूत 65 धावा केल्या. या खेळीत त्यानं चार चौकार आणि चार षटकार मारले. पंतने या सामन्यात मर्यादित षटकांमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली. पंत सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपेक्षा आहेत. पंतनं आतापर्यंत 9 एकदिवसीय सामन्यात 209 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य