मुंबई, 26 फेब्रुवारी : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात सध्या 3 टी20 सामन्यांची सीरिज सुरू आहे. या सीरिजनंतर 2 टेस्ट मॅच खेळल्या (IND vs SL Test Series) जातील. सीरिजमधील पहिली टेस्ट 4 मार्चपासून मोहालीमध्ये सुरू होणार आहे. तर दुसरी टेस्ट 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळली जाईल. ही डे-नाईट टेस्ट असून पिंक बॉलमध्ये होणार आहे. या टेस्टपूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. ही मॅच पाहण्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशननं (KCA) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केसीएचे प्रवक्ते विनय मृत्यूंजय यांनी ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘कर्नाटक सरकारच्या सध्याच्या नियमानुसार बेंगलुरू टेस्टसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या आम्ही यापेक्षा जास्त प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती करणार नाहीत. यासाठी तिकीटांचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. कर्नाटक स्टेट असोसिएसशनच्ये वेबसाईटवर 1 मार्चपासून याची विक्री करण्यात येणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 6 मार्चपासून तिकीट विक्री सुरू होईल. या तिकीटांची किंमत 100 ते 2500 रूपयांच्या दरम्यान असेल. दुपारी 2 ते रात्री 9 च्या दरम्यान हा सामना होईल. या सामन्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रण देण्याचा विचार केसीए करत आहे.’ बंगळुरूमध्ये होणारी टेस्ट ही यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार विराट कोहलीच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट होती. पण, त्यानंतर या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता सीरिजमधील पहिली टेस्ट मोहालीमध्ये होणार असून ती विराटच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट असेल. या सीरिजसाठी आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. 10 कोटींच्या बॉलरची कमाल, 28 बॉलमध्ये घेतल्या 6 विकेट्स! VIDEO भारतीय टेस्ट टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन (फिटनेसवर अवलंबूर), रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार. श्रीलंकन टेस्ट टीम : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पथुम निसांका, लाहिरु थिरिमाने, धनंजय डी सिल्वा, कुसल मेंडिस, एंजलो मैथ्यूज, दिनेश चंडीमल, चरित असलंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्व फर्नांडो, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रेमा आणि लसिथ एम्बुलडेनिया