JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: शुभमन गिलचं कौतुक करत सचिन म्हणतो, 'आता ती वेळ आली आहे'

IND vs NZ: शुभमन गिलचं कौतुक करत सचिन म्हणतो, 'आता ती वेळ आली आहे'

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलची (Shubman Gill) प्रशंसा करत आता ‘ती’ वेळ आली असल्याचं म्हंटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 नोव्हेंबर: क्रिकेट विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलची (Shubman Gill) प्रशंसा केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये शुभमननं अर्धशतक झळकावले होते.  मुंबई टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याचा मोठ्या स्कोअरकडे वाटचाल सुरू होती. त्यावेळी त्याला 44 रनवर एजाज पटेलनं (Ajaz Patel) आऊट केले. शुभमनच्या खेळाबद्दल ‘पीटीआय’शी बोलताना सचिन म्हणाला की, ’ प्रत्येक पिचवर खेळण्याचं वेगळं आव्हान असतं. शुभमनला या अनुभवातून फायदा झाला आहे. त्यानं ब्रिस्बेन टेस्टमध्ये 91 रनची खेळी केली आणि ती टेस्ट आपण जिंकली होती. ‘शुभमनकडे हार्ड आणि उसळत्या पिचवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या तंत्रामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यानं चांगली सुरुवात केली आहे. आता त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्याची वेळ आली आहे. त्याच्यावर शतकासाठी जास्त दबाव टाकण्याची गरज नाही. त्याच्यात मोठा स्कोअर करण्याची इच्छाशक्ती आहे. फक्त त्यानं चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकाग्रता भंग होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. शुभमन कानपूर आणि मुंबई या दोन्ही टेस्टमध्ये चांगल्या बॉलवर आऊट झाला. तो अजूनही शिकत आहे.’ असे सचिनने सांगितले. Sara Tendulkar’s Date Night : सचिनच्या मुलीनं पकडला कुणाचा हात? पाहा Photo टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) सचिननं कौतुक केलं आहे. ‘श्रेयसनं संधीचा पूर्ण फायदा घेतला. टीमचा स्कोअर फार नव्हता त्यावेळी त्यानं संस्मरणीय खेळी करत टीम इंडियाला विजयाच्या जवळ पोहचवले होते. त्यानं दोन्ही इनिंगमध्ये महत्त्वाची खेळी केली.’ असे सचिनने स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या