कानपूर, 29 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या कानपूर टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास रचला आहे. अश्विन आता टेस्ट क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर बनला आहे. त्यानं सोमवारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या टॉम लॅथमला (Tom Latham) आऊट करत हा इतिहास रचला. अश्निननं यावेळी हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकले. हरभजननं 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विननं त्याला 80 टेस्टमध्ये मागे टाकले आहे. आता अश्विनच्या पुढे कपिल देव (Kapil Dev) 434 विकेट्स आणि अनिल कुंबळे 619 विकेट्स हे दोन भारतीय बॉलर आहेत. अश्विननं चौथ्या दिवशी विल यंगला आऊट करत हरभजनच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये पदार्पण करणारा अश्निन हा गेल्या दशकातील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. त्यानं त्यानं 80 टेस्टमध्ये 2.80 च्या इकोनॉमी रेटनं 418 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. या प्रवासात त्यानं एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड 30 वेळा तर एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम 7 वेळा केला आहे.
अश्विनने त्याच्या करियरमध्ये 111 वनडे आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यात त्याने वनडेमध्ये 150 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 61 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 135 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 655 विकेट आहेत. अश्विन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब आणि पुण्याकडून खेळला आहे.