JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: विराट कोहली आणि रवी शास्त्रींना BCCI ची पर्वा नाही! हेल्थ प्रोटोकॉल मोडला?

IND vs ENG: विराट कोहली आणि रवी शास्त्रींना BCCI ची पर्वा नाही! हेल्थ प्रोटोकॉल मोडला?

टीम इंडियाच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट रद्द करण्यात आली. ही टेस्ट रद्द झाल्यानंतर हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 सप्टेंबर : टीम इंडियाच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट रद्द करण्यात आली. ही टेस्ट रद्द झाल्यानंतर हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमात हेल्थ प्रोटोकॉलची अवहेलना झाली होती. चौथ्या टेस्टच्या एक दिवस आधी लंडनमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमानंतरच शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरूण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि फिजियो नितिन पटेल पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत. त्यापाठोपाठ भारतीय टीमचे सहाय्यक फिजियो योगेश परमारही पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात बाहेरील पाहुणे देखील आले होते. BCCI ची परवानगी नव्हती ब्रिटनमधील नियमांमध्ये सूट असल्यानं या कार्यक्रमात कुणीही मास्क घातला नव्हता. शास्त्री, कोहली किंवा टीम इंडियाच्या सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बीसीसीआयची लेखी परवानगी घेतली नव्हती, अशीही माहिती आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार,’ अध्यक्ष सौरव गांगुली किंवी सचिव जय शाह यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. ब्रिटनमध्ये आरोग्य सुरक्षा नियमांमध्ये सूट असल्यानं या परवानगीची गरज नाही, असं त्यांना वाटलं असावं.’ टीम इंडियाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांचं या प्रकारच्या कार्यक्रमासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि प्रोटोकॉलचे पालन होईल, याची खबरदारी घेणे हे काम होते. काय शिक्षा मिळणार? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘T20 वर्ल्ड कपपूर्वी कोहली किंवा शास्त्री यांना या प्रकरणात शिक्षा मिळण्याची शक्यता कमी आहे. शास्त्री यांची मुदत त्यानंतर संपत आहे. कोहली कॅप्टन असल्यानं त्यालाही शिक्षा मिळणार नाही. या प्रकरणात व्यवस्थापक म्हणून काय केलं याबाबत डोंगरे यांना विचारणा होऊ शकते. PAK vs NZ : पाकिस्तानचं नाक पुन्हा कापलं गेलं, न्यूझीलंड सीरिजआधी ओढावली मोठी नामुष्की पाचवी टेस्ट व्हावी अशी बीसीसीआयची इच्छा होतीा. पण काही सिनिअर खेळाडू खूप घाबरले होते. त्यामुळे दोन्ही बोर्डांना त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी वाटली. हे खेळाडू दहा दिवस क्वारंटाईन आणि बबल राहण्यास घाबरले होते. पण त्यांनी या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला जाताना ही काळजी का घेतली नाही?’ असा प्रश्न या अधिकाऱ्यानं विचारला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या