मुंबई, 11 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 वी टेस्ट रद्द झाली आहे. ही टेस्ट रद्द झाल्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) 4 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयनं प्रयत्न सुरू केले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) या महिन्यात ब्रिटनचा दौरा करणार आहेत. गांगुली 22 किंवा 23 सप्टेंबर रोजी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन आणि इयन वॉटमोर यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यातील रद्द झालेली मँचेस्टर टेस्ट पुढील वर्षी आयोजित करण्याच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं 4 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. याचं कोणतंही इन्शूरन्स नाही. इंग्लिश क्रिके बोर्डाला ब्रॉडकास्टर्सचे 3 अब्ज डॉलर्स आणि टिकीट हॉस्पिलिटीचे 1 अब्जचं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला आता काही पर्याय देण्यात आले आहेत. त्यावर विचार करावा लागेल असं मत हॅरीसन यांनी स्काय स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त केले आहे. पुढच्या वर्षी जर एक वेगळी टेस्ट झाली तर भारताला या सीरिजमध्ये विजयी घोषित केले जाईल, पण याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भारतीय टीम पुढील वर्षी जुलै महिन्यात लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये येणार आहे. त्यावेळी यंदा रद्द झालेली टेस्ट खेळवण्यावर सध्या विचार सुरू आहे. US Open 2021: जोकोविचची फायनलमध्ये धडक, इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट मॅच (India vs England 5th Test) कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली. भारतीय टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि बीसीसीआय (BCCI) यांनी हा निर्णय घेतला