JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: चौथी टेस्ट आजपासून, ओव्हलमध्ये असं असणार 5 दिवस हवामान

IND vs ENG: चौथी टेस्ट आजपासून, ओव्हलमध्ये असं असणार 5 दिवस हवामान

ओव्हल टेस्ट (IND vs ENG Oval Test) जिंकणारी ही टीम ही सीरिज हरणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमसाठी ही टेस्ट ‘करो वा मरो’ अशी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओव्हल, 2 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून (गुरुवार) ओव्हलवर (IND vs ENG Oval Test) सुरु होत आहे. हेडिंग्ले टेस्टमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे 5 टेस्टची ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. ओव्हल टेस्ट जिंकणारी ही टीम  ही सीरिज हरणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमसाठी ही टेस्ट ‘करो वा मरो’ अशी आहे. टीम इंडियानं ओव्हल टेस्ट गमावली तर 2007 नंतर इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहील. भारतीय टीमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवामान खूप महत्त्वाचं असेल. कारण, इंग्लंडमधील हवामान हे लहरी असून ते कधी बदलते याचा पत्ताही लागत नाही. ‘क्यूवेदर डॉट कॉम’ नुसार ओव्हल टेस्टच्या पहिल्या दिवशी सुरुवातीचे काही तास ढगाळ वातावरण असेल. मात्र दुपारनंतर ऊन पडेल. ओव्हलचं पिच हे बॅटींगसाठी अनुकूल आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये इंग्लंडमधील सर्व पिचपेक्षा येथील सरासरी जास्त आहे. त्यामुळे इथं बॅटींग करताना फार त्रास होणार नाही. मात्र पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यानं सुरुवातीचे काही तास फास्ट बॉलर्सना मदत मिळण्याचा अंदाज आहे. पण, पहिले दोन दिवस पावासाची शक्यता जवळपास नाही, ही चांगली बातमी आहे.

पावसाची शक्यता ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 4 स्पटेंबर रोजी पावसाची शक्यता 50 टक्के आहे. तसंच चौथ्या आणि पाचव्या दिवशी देखील पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टेस्टमध्ये टॉस कोण जिंकणार याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

CPL 2021: सुपर ओव्हरमध्ये हरली शाहरुख खानची टीम, पोलार्डची पॉवर फेल! टीम इंडियात होणार बदल कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) देखील हेडिंग्ले टेस्टमधील पराभवानंतर याचे संकेत दिले होते. फास्ट बॉलर्सना सतत टेस्ट मॅचमध्ये खेळवलं तर ते दुखापतग्रस्त होतील, असं विराटनं म्हंटलं होतं. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियात इशांत शर्माच्या (Ishant Sharma) जागी आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश होण्याची शक्यता आहे. ओव्हलचं पिच स्पिन बॉलर्सला मदत करतं असा इतिहास आहे. त्यामुळे या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन हे दोन स्पिनर खेळण्याची शक्यता आहे. अश्विनचा खेळवण्याचा निर्णय टॉसपूर्वी होणार असल्याचं टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या