JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : जोहान्सबर्गमध्ये इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी, कधी आणि कुठे पाहणार मॅच?

IND vs SA : जोहान्सबर्गमध्ये इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी, कधी आणि कुठे पाहणार मॅच?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट आज (सोमवार) होईल. जोहान्सबर्गच्या द वाँडर्स स्टेडियमवर (Johannesburg Wanderers stadium) ही टेस्ट होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट आज (सोमवार) सुरु होणार आहे. जोहान्सबर्गच्या द वाँडर्स स्टेडियमवर (Johannesburg Wanderers stadium) ही टेस्ट होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ही टेस्ट जिंकून दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी टीम इंडियाला आहे. भारतीय बॉलर्सनी सेंच्युरियन टेस्टमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांनी आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये 197 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 191 रनवर रोखले. या टेस्टमध्येही बॉलर्सकडून त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल. टीम इंडियाची मिडल ऑर्डर फारशी फॉर्मात नाही. विराट कोहलीसह (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर मोठ्या खेळीचा दबाव आहे. केएल राहुलनं (KL Rahul) सेंच्युरियनमध्ये शतक रचत विजयाचा पाया रचला होता. राहुल आणि मयंक या ओपनिंग जोडीवर या टेस्टमध्येही मोठी जबाबदारी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी पहिल्या टेस्टमध्ये कमबॅक केले होते. लुंगी एन्गिडी आणि कागिसो रबाडाने भारतीय बॅटर्सना त्रस्त केले होते. आता सीरिज वाचवण्यासाठी त्यांना आणखी जोरदार कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर आफ्रिकेच्या बॅटर्सनीही चांगले योगदान दिले तर टीम इंडियाची अडचण वाढू शकते. न्यूझीलंड टीमलाही कोरोनाचा फटका, प्रतिष्ठेच्या सीरिजमधून दिग्गज खेळाडू घेणार माघार! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टेस्ट कधी सुरू होईल? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टेस्ट 3 जानेवारी (सोमवार) पासून सुरू होणार आहे. ही मॅच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर टॉस दुपारी 1.00 वाजता होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टेस्ट कुठे होणार आहे? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टेस्ट जोहान्सबर्गमध्ये खेळली जाणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्टचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? भारतामध्ये  टेस्टचे लाईव्ह प्रसारण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर पाहता येणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्टचे Live Streaming कुठे पाहता येईल? पहिल्या टेस्टचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस-हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या