मुंबई, 22 डिसेंबर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वन-डे सामने खेळणार आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट (India vs South Africa) 26 डिसेंबर रोजी सुरू होईल. भारतीय टीमला आजवर आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या सीरिजनंतर पुढील महिन्यात वन-डे सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा कॅप्टन असेल. रोहित दुखापतीमुळे सध्या दक्षिण आफ्रिकेला गेलेला नाही. पण, तो वन-डे सीरिज खेळू शकतो. वन-डे टीमची घोषणा अद्याप झालेली नाही. विराट कोहलीकडून (Virat Kohli) वन-डे टीमची कॅप्टनसी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे तो या सीरिजमध्ये बॅटनं उत्तर देण्याच्या तयारीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील बॉलिंगचा रेकॉर्ड पाहिला तर रोहितनं आर. अश्विनपेक्षा (R. Ashwin) जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ही गोष्ट सर्वांना धक्कादायक वाटत असली तरी खरी आहे. इतकंच नाही तर विराटनही अश्विनच्या बरोबरीनं विकेट घेतल्या आहेत. याचाच अर्थ वन-डे सीरिजमध्ये रोहित आणि विराट बॅटप्रमाणेच बॉलिंगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर्वात जास्त विकेट्स कुणाला? दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध वन-डे मध्ये सर्वात जास्त विकेट्स कुलदीप यादवच्या नावावर आहेत. त्याने 6 मॅचमध्ये 14 च्या सरासरीनं 17 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप सध्या दुखापतग्रस्त आहे. लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 16 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय बॉलर आहे. चहलने विजय हजारे स्पर्धेतही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वन-डे सीरिजसाठी निवड नक्की आहे. फस्ट बॉलर्समध्ये मोहम्मद शमीनं 3 इनिंगमध्ये 9 तर बुमराहनं 6 इनिंगमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, 3 वर्षापूर्वीची जखम अद्याप ताजी रोहित शर्मानं 22 च्या सरासरीनं 3 विकेट्स घेतल्या आहेत. 30 रन देत 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याशिवाय आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. जडेजा सध्या दुखापतग्रस्त असल्यानं वन-डे टीममधील त्याची निवड अनिश्चित आहे. तर अश्विनची वन-डे टीममध्ये निवड होऊ शकते. त्याने यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती.