JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिका टीमची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पहिल्यांदाच समावेश

IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिका टीमची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पहिल्यांदाच समावेश

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. फास्ट बॉलर एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) दुखापतीमुळे या सीरिजचमध्येही खेळणार नाही. त्याने टेस्ट सीरिजमधून यापूर्वीच माघार घेतली आहे. नॉर्खियाच्या अनुपस्थितीमध्ये तरुण बॉलर मार्को जेनसनचा (Marco Jansen) पहिल्यांदाच वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. 21 वर्षांच्या जेनसनला मागील वर्षी झालेल्या आयपीएल सिझनसाठी (IPL 2021) मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केले होते. त्याला दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या टेस्टमध्ये पदार्पणाची संधी दिली. त्या टेस्टमध्ये त्यानं 5 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. टेस्ट क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या डी कॉकचाही (Quinton De Kock) आफ्रिकेच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तेम्बा बावूमा वन-डे टीमचा कॅप्टन असेल. तर केशव महाराज व्हाईस कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. ‘आमची टीम चांगली आहे. भारतासारख्या बड्या प्रतिस्पर्धी टीमविरुद्ध खेळण्यासाठी सर्व खेळाडू उत्साहित आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी सीरिज असेल,’ दक्षिण आफ्रिका निवड समितीचे समन्वयक व्हिक्टर एम. यांनी व्यक्त केले आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन वन-डे 19 आणि 21 जानेवारी रोजी पार्लमध्ये होतील. तर तिसरी वन-डे 23 जानेवारी रोजी केपटाऊनमध्ये होणार आहे. IND vs SA : सेंच्युरियनमध्ये धक्का, जोहान्सबर्ग टेस्टआधी द्रविडची टीम इंडियाला तंबी! दक्षिण आफ्रिकेची टीम:  तेम्बा बावूमा (कॅप्टन), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, जुबैर हमजा, मार्को जेनसन, जान्नेमन मालान, सिसांडा एमगाला, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पारनेल, एंडिले फेलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डेर डुसेन, काइल वेरेन्ने.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या