JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडूंनी लगावले ठुमके! VIDEO

IND vs SA : सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडूंनी लगावले ठुमके! VIDEO

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजची (India vs South Africa) सुरूवात विजयानं केली आहे. टीममधील सर्व सदस्यांनी या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सेंच्युरियन, 31 डिसेंबर : टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजची (India vs South Africa) सुरूवात विजयानं केली आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये 113 रननं विजय मिळवत भारतीय टीमनं सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. ओपनर बॅटर केएल राहुलचं (KL Rahul) शतक आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) 5 विकेट्स यामुळे हे या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. राहुलची ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. या विजयानंतर टीम इंडियानं जोरदार सेलिब्रेशन केले. टीम इंडिया हॉटेलमध्ये परतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. त्यावेळी आर. अश्विन (R. Ashwin), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत डान्स केला. अश्विननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बीसीसीआयनं (BCCI) देखील सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये विकेटकिपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि मोहम्मद शमी केक कापत आहेत. पंतनं या मॅचमध्ये स्टंपमागे 100 जणांना आऊट केले. ही कामगिरी सर्वात कमी टेस्टमध्ये करणारा तो भारतीय विकेट किपर बनला आहे. तर मोहम्मद शमीनं टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.

तीन टेस्टच्या या सीरिजमधील पुढची टेस्ट दोन जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. टीम इंडियानं आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी आहे. क्विंटन डी कॉकची अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, क्रिकेट विश्वात खळबळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या