JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : टीम इंडियाच्या फास्ट बॉलरची होणार फिटनेस टेस्ट, तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याबाबत सस्पेन्स

IND vs ENG : टीम इंडियाच्या फास्ट बॉलरची होणार फिटनेस टेस्ट, तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याबाबत सस्पेन्स

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या टेस्टपूर्वी फास्ट बॉलर उमेश यादवची (Umesh Yadav) फिटनेस टेस्ट होणार आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये ही टेस्ट होईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 20 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या टेस्टपूर्वी फास्ट बॉलर उमेश यादवची (Umesh Yadav) फिटनेस टेस्ट होणार आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये ही टेस्ट होईल. या फिटनेस टेस्टनंतर उमेश, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्यासमोबत खेळणार का? हे स्पष्ट होईल. उमेश दुखापतीमुळे सिडनी टेस्टच्यापूर्वी भारतामध्ये परतला होता. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये होणार असून ती डे-नाईट टेस्ट आहे. टर्निंग पिचचा अंदाज अहमदाबादमध्ये होणाऱ्या या टेस्टमध्येही स्पिन बॉलिंगला मदत करणारं पिच असेल असा अंदाज आहे. आर. अश्विन आणि अक्षर पटेलला या पिचचा फायदा होऊ शकेल. या दोघांनी चेन्नईमधील दुसऱ्या टेस्टमध्ये 20 पैकी 15 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नईतील दुसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. आता आगामी टेस्टमध्ये त्याचा समावेश नक्की आहे. त्यामुळे कुलदीप यादव किंवा मोहम्मद सिराजपैकी एकाला बाहेर बसावं लागू शकते. कुलदीप यादव दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच खेळला होता. त्यानं त्या टेस्टमध्ये दोन विकेट्स घेतल्या होत्या. या टेस्टसाठी तिसऱ्या टेस्टमधील जागेसाठी कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात स्पर्धा आहे. ( वाचा :  गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूचा विमानतळावर अपमान, क्रीडा मंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप! )  चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिल्या दोन टेस्ट चेन्नईत झाल्या. त्यापैकी पहिली टेस्ट इंग्लंडनं जिंकली. तर दुसरी टेस्ट जिंकून भारतानं कमबॅक केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारत-इंग्लंड या दोन्ही टीमसाठी आगामी दोन टेस्ट महत्त्वाच्या आहेत. इंग्लंडला फायनल गाठण्यासाठी आगामी दोन्ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहेत. तर भारताला दोनपैकी एकही टेस्ट गमावून चालणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या