मुंबई, 1 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट गुरुवारपासून ओव्हलवर सुरू (India vs England 4th test) होणार आहे. या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये पावसामुळे टीम इंडियाचा विजय हुकला. लॉर्ड्सवर झालेली दुसरी टेस्ट टीम इंडियानं जिंकली. तर हेडिंग्लेमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियामध्ये आणखी एका फास्ट बॉलरचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियानं ओव्हल टेस्टपूर्वी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) टीममध्ये समावेश केला आहे. कृष्णा इंग्लंड दौऱ्यावरील टीमसोबत स्टँडबाय खेळाडू म्हणून होता. कर्नाटक आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सदस्य असलेल्या कृष्णाचा पहिल्यांदाचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी इंग्लंड टीम भारतामध्ये आली होती. त्यावेळी कृष्णा 3 वन-डे सामने खेळला आहे.यामध्ये त्यानं 6 विकेट्स घेतल्या आहेत.
तालिबान संकटात ICC ची मदत नाही, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचा दावा ओव्हल टेस्टसाठी भारतीय टीम : रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा , अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा