JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: चेन्नई टेस्टपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा!

IND vs ENG: चेन्नई टेस्टपूर्वी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट पाच फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरु होत आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 29 जानेवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट पाच फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरु होत आहे. भारतीय पिचवर टेस्ट मॅच जिंकण्याचा एक नेहमीचा फॉर्म्युला आहे. या सीरिजमध्येही त्याच आधारावर टीम इंडिया विजयी होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. इंग्लंडच्या टीमलाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनीही याची तयारी सुरु केली आहे. टीम इंडियाला इशारा चेन्नईचं पिच हे नेहमी बॅट्समन आणि स्पिन बॉलर्सना मदत करतं, असा इतिहास आहे. भारतीय टीममध्ये चांगले स्पिनर्स आहेत. या स्पिनर्सच्या जोरावर भारताला पहिल्या टेस्टमध्ये जिंकण्याची अधिक संधी असेल, असा सर्वांचा अंदाज आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने यंदा ‘चांगलं पिच’ असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. ‘त्याचबरोबर भारतीय टीम स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर आम्हाला हरवू शकत नाही, असा इशाराही आर्चरनं दिला आहे. काय म्हणाला आर्चर? जोफ्रा आर्चरनं ‘डेली मेल’ या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आहे. त्यामध्ये आर्चर म्हणतो, “मी भारतामध्ये IPL स्पर्धेच्या दरम्यान भरपूर क्रिकेट खेळलो आहे, पण मला इथं फर्स्ट क्लास क्रिकेटचा कोणताही अनुभव नाही.  मला लवकरच भारतीय पिचवर ‘रेड बॉल’नं बॉलिंग करताना येणारी आव्हानं माहिती होतील.

(वाचा -  धोनी आणि युवराजला आऊट करणारा बॉलर मॅच फिक्सिंगमध्ये दोषी! )

IPL स्पर्धेत बॅट्समनला तुमचा बॉल खेळावा लागतो. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची इच्छा असेल तर तो संपूर्ण सत्र शांत खेळू शकतो. तसंच पिचची मदत मिळत नसेल तरी तुम्ही काही करु शकत नाही. आम्हाला चेन्नईमध्ये चांगल्या पिचची अपेक्षा आहे. आमच्या फास्ट बॉलर्सना त्याचा फायदा मिळेल. आमच्याकडंही चांगले स्पिनर आहेत. त्यामुळे पिचनं स्पिनर्सना मदत केली तरी या मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत, असा इशारा आर्चरनं दिला आहे. 2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये जोफ्रा आर्चरनं सुपर ओव्हर टाकली होती. आर्चरच्या ओव्हरनंतरच इंग्लंडनं विजेतेपद जिंकलं होतं. आर्चरला आजवर 11 टेस्टचा अनुभव असून तो आशिया खंडात पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या