JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : इंग्लंडनं टॉस जिंकला, टीम इंडियामध्ये दोन बदल

IND vs ENG : इंग्लंडनं टॉस जिंकला, टीम इंडियामध्ये दोन बदल

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये (Day - Night Test) इंग्लंडनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये (Day - Night Test) इंग्लंडनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टीमसाठी ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे. ही मॅच जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडने चार तर भारताने दोन बदल केले आहेत.

भारतीय टीममध्ये कुणाचा समावेश ? चेन्नईमध्ये झालेली दुसरी टेस्ट जिंकलेल्या भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) या मॅचमध्ये पुनरागमन झालं आहे. विशेष म्हणजे बुमराहचं हे होम ग्राऊंड आहे. मोहम्मद सिराजच्या जागी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. तसंच वॉशिंग्टन सुंदरचा कुलदीप यादवच्या जागेवर समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडच्या टीममध्ये देखील चार बदल करण्यात आले आहेत. जॉनी बेअरस्टो, जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि झॅक क्राऊलीचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

इशांत शर्माची शंभरावी टेस्ट भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माची (Ishant Sharma) ही शंभरावी टेस्ट आहे. शंभर टेस्ट खेळणारा इशांत हा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच फास्ट बॉलर आहे. या निमित्तानं इशांतला शुभेच्छा देणारा एक खास व्हिडीओ देखील बीसीसीआयच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. ( वाचा :  जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! ) तिसऱ्या टेस्टसाठी भारताची टीम - विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा तिसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम  - जो रुट, डॉम सिबले, झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या