JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: टीम इंडियाच्या कामगिरीवर गांगुली खूश, ओव्हल टेस्टबद्दल केलं मोठं वक्तव्य

IND vs ENG: टीम इंडियाच्या कामगिरीवर गांगुली खूश, ओव्हल टेस्टबद्दल केलं मोठं वक्तव्य

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडियानं ओव्हल टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या कामगिरीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) खूश झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओव्हल, 6 सप्टेंबर: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडियानं ओव्हल टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 191 रनवर ऑल आऊट झाली होती. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माचं शतक, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडला 368 रनचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताची बॅटींग पाहून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) भलतेच खूश झाले आहेत. या टेस्टमध्ये भारत हरु शकत नाही, असं वक्तव्य गांगुलीनं केलं आहे. त्यानं ट्विट करत याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्रिकेटचं सर्वात चांगलं स्वरुप. एका चांगल्या पद्धतीनं लढलेल्या टेस्ट सीरिजमध्ये कोणीही हरवू शकत नाही. ऑस्ट्रेलिया आणि इथं…क्रिकेटचं सर्वोत्तम रुप.’ असं ट्विट गांगुलीनं केलं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसावर वर्चस्व ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मानं शतक आणि चेतेश्वर पुजारानं अर्धशतक झळकावलं. तर चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूरनं पुन्हा एकदा अर्धशतक झळकावलं. त्यानं 72 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्स लगावत 60 रन काढले.

4 टेस्टमध्ये 3 अर्धशतकं, ‘लॉर्ड’ ठाकूरमुळे या स्टार खेळाडूचं करियर धोक्यात! त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनीही 9 व्या विकेटसाठी 36 रनची पार्टनरशिप केली. बुमराहनं 38 बॉलमध्ये 4 फोरसह 24 रन काढले. तर उमेश यादवनंही 23 बॉलमध्ये 25 रनची खेळी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या