JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: इंग्लंडला अश्विनची धास्ती! ओव्हल टेस्टमध्ये वापरणार 'हे' डावपेच

IND vs ENG: इंग्लंडला अश्विनची धास्ती! ओव्हल टेस्टमध्ये वापरणार 'हे' डावपेच

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England, 4th Test) ओव्हलमध्ये होणार आहे. पाच टेस्टची ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. त्यामुळे ही टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओव्हल, 2 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट (India vs England, 4th Test) ओव्हलमध्ये होणार आहे. पाच टेस्टची ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. त्यामुळे ही टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. टीम इंडिया ओव्हल टेस्टमध्ये ऑफ स्पिनर आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश करण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मॅचपूर्वी घेणार असल्याचं टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांनी सांगितलं आहे. अश्विनच्या धास्तीनं इंग्लंड टीम ओव्हल टेस्टसाठी नवं डावपेच खेळेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. अरुण यांनी यावेळी सांगितलं की, ‘अश्विन हा जगातील सर्वश्रेष्ठ बॉलरपैकी एक आहे. पण दुर्दैवानं आम्हाला त्याला आजवर खेळवता आलेलं नाही. संधी मिळाली आणि टीमच्या रणनीतीसाठी योग्य असेल तर आम्ही दोन स्पिनर्ससह खेळू’, असं त्यांनी सांगितलं. इंग्लंड वापरणार डावपेच इंग्लंडच्या टीमला धास्ती असून त्यामुळे ते ओव्हलच्या पिचमध्ये बदल करु शकतात, असे संकेतही अरुण यांनी दिले आहेत. ‘ओव्हलचे पिच स्पिन बॉलर्सला मदत करणारे आहे. पण इंग्लंडला अश्विनची धास्ती आहे. या पिचनं त्याला मदत केली तर काय करायचं ही चिंता त्यांना सतावत आहे. गुरुवारी मॅचपूर्वी पिच पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलतील’ असं अरुण यांनी स्पष्ट केले. IND vs ENG: ‘ही चूक कधी करू नका’, ओव्हल टेस्टपूर्वी रवी शास्त्रींचा इंग्लंडला इशारा अश्विनला इंग्लंड दौऱ्यावर सलग तीन टेस्ट बेंचवर बसावं लागलं आहे. त्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर कांऊटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना 6 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विननं टेस्टमध्ये 5 शतकही झळकावले असून लोअर ऑर्डरच्या सोबतीनं रन बनवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या