JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: ओव्हल टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाला द्रविडचं अनुकरण करण्याची गरज

IND vs ENG: ओव्हल टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाला द्रविडचं अनुकरण करण्याची गरज

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्टच्या मालिकेतील चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलवर होत आहे. या मैदानाशी भारताचं खास नात आहे. 50 वर्षांपूर्वी याच मैदानात टीम इंडियानं इंग्लंडमधील पहिली टेस्ट जिंकली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट:  टीम इंडियानं इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स टेस्ट जिंकत या सीरिजमध्ये आघाडी घेतली होती. पण त्यानंतर लीड्स टेस्टमध्ये इंग्लंडनं मोठ्या विजयासह मालिकेत 1-1 नं बरोबरी केली आहे. आता पाच टेस्टच्या मालिकेतील चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलवर होत आहे. या मैदानाशी भारताचं खास नात आहे. 50 वर्षांपूर्वी याच मैदानात टीम इंडियानं इंग्लंडमधील पहिली टेस्ट जिंकली होती. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडचंही (Rahul Dravid) हे आवडतं मैदान आहे. त्यानं या मैदानात दोन शतक झळकावली आहेत. ओव्हलच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये इंग्लंडनं चार तर भारतानं एक टेस्ट जिंकली आहे. अन्य 7 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 1936 साली याच मैदानावर झाली होती. त्यामध्ये यजमान टीमनं 9 विकेट्सनं विजय मिळवला होता. या मैदानावर दोन टीममधील शेवटची लढत 2018 साली झाली. ती टेस्ट इंग्लंडनं 118 रननं जिंकली. केएल राहुलचे 149 आणि ऋषभ पंतचे 114 रन टीम इंडियाचा पराभव टाळू शकले नाहीत. राहुल द्रविडचा जबरदस्त रेकॉर्ड राहुल द्रविडनं या मैदानावर 3 टेस्टमध्ये 110 च्या सरासरीनं 443 रन काढले आहेत. त्यानं इथं दोन शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. 2002 साली द्रविडनं ओव्हलवर 217 रनची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. त्यामुळे टीम इंडियानं ती टेस्ट ड्रॉ करण्यात यश मिळवलं. त्याशिवाय 2007 मध्ये 55  आणि 2011 मध्ये नाबाद 146 रनची खेळी द्रविडनं या मैदानावर केली आहे. कुंबळेचं शतक या मैदानावर अनिल कुंबळेनं (Anil Kumble) ही कमाल केली आहे. कुंबळेनं या 2007 साली झाली झालेल्या टेस्टमध्ये नाबाद 110 रन काढले होते. कुंबळेच्या कारकिर्दीमधील हे एकमेव शतक आहे. कुंबळेशिवाय दिनेश कार्तिक 91, राहुल द्रविड 55, सचिन तेंडुलकर 81, व्हीव्हीएस लक्ष्मण 51 आणि महेंद्रसिंह धोनीनं 92 रन काढल्यानं टीम इंडियानं त्या टेस्टमध्ये 664 रन काढले होते. National Sports Day 2021: जेव्हा ध्यानचंद यांनी हिटलरला ठणकावलं होतं, ‘मी देशाचं मीठ खाल्लं आहे’ गावसकर आणि शास्त्रीचीही कमाल टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी 1979 साली ओव्हलवर चौथ्या इनिंगमध्ये 221 रनची आकर्षक इनिंग खेळली होती. त्यामुळे भारताला ती टेस्ट ड्रॉ करता आली होती. टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री यांनी 1990 साली 187 रनची दमदार खेळी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या