JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

तब्बल 44 वर्षानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या मैदानावर सामना होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 08 जुलै: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सेमीफायनमध्ये प्रवेश केला आहे. उद्या (9 जुलै) भारतीय संघाचा मुकाबला मॅनचेस्टर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. तब्बल 44 वर्षानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या मैदानावर सामना होणार आहे. इतक नव्हे तर वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकल्यास भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना 1975 साली झाला होता. पण तेव्हा पासून आतापर्यंत दोन्ही संघ कधीच सेमीफायनलमध्ये लढले नाहीत. 1975साली झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला होता. याशिवाय दोन्ही संघांच्यात वर्ल्ड कपमध्ये सात सामने झाले आहेत. या 7 पैकी न्यूझीलंडने 4 सामने जिंकले आहेत तर भारताने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळेच इतिहासातील कामगिरी विचारात घेतल्यास न्यूझीलंडचे पारडे जड दिसते. याउटल यंदाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीचा विचार केल्यास भारतीय संघाची कामगिरी अधिक वरचढ ठरते. साखळी फेरीतील 9 पैकी सर्वाधिक 7 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. भारताचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. अर्थात तोही न्यूझीलंडविरुद्धच होता. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. न्यूझीलंडचा विचार केल्यास सुरुवातीला सोपे सामने जिंकून त्यांनी आघाडी घेतली होती. पण नंतर न्यूझीलंड कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यांना 9 पैकी पाच सामन्यात विजय मिळवता आला आणि ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर राहिले. वनडे क्रिकेटमध्ये भारतच वरचढ वनडे क्रिकेटचा विचार केल्यास न्यूझीलंडविरुद्ध भारतच वरचढ ठरतो. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत 106 सामने झाले आहेत. त्यापैकी 55 सामन्यात भारताने तर न्यूझीलंडने 45 सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना टाय तर पाच सामने रद्द झाले आहेत. आयसीसी क्रमवारीचा विचार केल्यास भारतीय संघ दुसऱ्या तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. VIDEO : ‘माझ्या मुलाला वाचवा’, नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या