JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी : हिटमॅन रोहित शर्माची झेप, पहिल्यांदाच टाकलं विराटला मागं!

मोठी बातमी : हिटमॅन रोहित शर्माची झेप, पहिल्यांदाच टाकलं विराटला मागं!

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी भरारी घेतली आहे. रोहितनं पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी भरारी घेतली आहे. रोहितनं पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्यानं भारतीय कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मागं टाकलं आहे. कोहलीची एक क्रमांकानं घसरण झाली असून तो आता सहव्या नंबरवर आहे. या दोघांशिवाय एकही भारतीय बॅट्समन टॉप टेनमध्ये नाही. आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. रूट 6 वर्षांनी टॉपवर पोहचला आहे. त्यानं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला मागे टाकलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये रूटनं 3 सेंच्युरीसह 507 रन केले आहेत. त्याची सरासरी 127 आहे. तर रोहित शर्मानं हेडिंग्लेमध्ये झालेल्या टेस्टमध्ये 19 आणि 59 रनची इनिंग खेळली होती.

संबंधित बातम्या

पुजाराचा फायदा चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) हेडिंग्ले टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 91 रन काढले होते. त्यामुळे त्याला तीन क्रमांकाचा फायदा झालाय. तो आता 15 व्या नंबरला पोहचला आहे. बॉलर्सच्या यादीत जसप्रीत बुमराह 10 व्या तर आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. IND vs ENG : ओव्हल टेस्टसाठी टीम इंडियात ‘या’ खेळाडूचा समावेश इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनला एक क्रमांकाचा फायदा झाला असून तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. ओली रॉबिन्सनला 9 क्रमांकाचा फायदा झालाय तो आता 36 व्या तर क्रेग ओव्हरटन 73 व्या क्रमांकावर पोहचला आहे. हेडिंग्ले टेस्टमध्ये या त्रिकुटानंच टीम इंडियाला गुंडाळत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या