JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 वर्ल्ड कप भारताबाहेर होणार! BCCI सचिवांचं शिक्कामोर्तब

T20 वर्ल्ड कप भारताबाहेर होणार! BCCI सचिवांचं शिक्कामोर्तब

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणारा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारताच्या बाहेर होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिन जय शहा (Jay Shah) यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणारा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारताच्या बाहेर होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा देशाबाहेर आयोजित होऊ शकते, असं त्यांनी सांगितले. यापूर्वी IPL 2021 स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकामुळे स्थगित करावी लागली होती. त्यानंतर या स्पर्धेचा दुसरा टप्पा आता यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआय सचिवांनी ANI ला दिलेल्या  प्रतिक्रियेमध्ये सांगितले की, “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये घेतली जाऊ शकते. त्याबाबतचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत." टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीनं (ICC) बीसीसीआयला जून अखेरपर्यंत मूदत दिली आहे. 17 ऑक्टोबरला होणार सुरूवात ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, टी-20 वर्ल्ड कप दोन टप्प्यांत खेळवला जाणार आहे. पहिला टप्पा हा यूएईमध्ये आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, पहिल्या राऊंडमध्ये 1 ते 12 मॅचेस होतील ज्यामध्ये 8 टीम्समध्ये मॅच होतील. या 8 टीम्सपैकी 4 टीम्स सुपर 12 साठी क्वॉलिफाय होतील. सुपर 12मध्ये एकूण 30 मॅचेस होतील. 24 ऑक्टोबर पासून या मॅचेसची सुरुवात होईल. सुपर 12 मधील टीम्सला 6-6 अशा दोन गटात विभागले जाईल. या लढती यूएईतील दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे खेळवल्या जातील. सुपर 12 नंतर 3 ‘प्ले ऑफ’ मॅच खेळवल्या जातील. यामध्ये 2 सेमीफायनल आणि फायनल मॅचचा समावेश आहे. ‘IPL मागे धावणाऱ्यांना टीममध्ये जागा नको,’ आयपीएल विजेत्या कॅप्टनचीच मागणी भारतातील कोरोनामुळे मिर्माण झालेली परिस्थिती पाहता टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणे कठीण आहे. यासोबतच आयपीएल 2021चा दुसरा टप्पा सुद्धा यूएईमध्ये होत आहे. अशा परिस्थितीत टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी यूएई योग्य जागा मानली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या